पुणे Pune Loksabha Election 2024: पुणे लोकसभा मतदार संघात यंदा तिरंगी लढत होती. भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीपूर्वी मनसेत असणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत वंचितकडून निवडणूक लढवली होती.
मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर: राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष पुणे लोकसभा मतदारसंघाकडं लागलं होतं. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर अशी लढत पाहायला मिळाली. आज झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले झाले असून तब्बल 1 लाखांहून अधिक मतांनी ते विजयी झाले आहेत.
पुणेकरांनी विकासाला साथ दिली : पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरी पर्यंत मोहोळ हे आघाडी होते. मोहोळ हे विजयी झाल्यावर कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला आहे. यावेळी मोहोळ यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत हा विजय महायुतीच्या कार्यकर्त्यांचा असून पुणेकरांनी विकासाच्या मुद्द्याला साथ दिल्याचं म्हटलं. या निवडणुकीत खालच्या पातळीवर टीका झाली पण पुणेकर नागरिकांनी विकासाच्या मुद्द्याला साथ दिली असल्याचं यावेळी मोहोळ म्हणाले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल
वर्ष - 2019 गिरीश बापट (विजयी उमेदवार- भाजप) 61.13% मतं