नागपूर Devendra Fadnavis On NCP: निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला झटका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखेर अजित पवार यांच्या गटाला मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या संदर्भात मंगळवारी निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालावर रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, "राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाला मिळेल हा निर्णय अपेक्षित होता. गेल्या अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगाने या पद्धतीनेच भूमिका घेतली आहे. अगदी समाजवादी पार्टीच्या केस वेळीही निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका आणि इतर पाच प्रकरणात घेतलेली भूमिका अशीच आहे. बहुमताने घेतलेला निर्णय हा लोकशाहीत महत्त्वाचा असतो."
पक्षाचे जे संविधान आहे, त्याचं किती पालन करण्यात आलं खूप महत्त्वाचं असतं. सगळ्या गोष्टींचा उहापोहा नंतरचं निर्णय करण्यात आला आहे. त्यामुळं मी अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो. अपेक्षा आहे त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रात उत्तम काम करेल - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री