महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

ETV Bharat / politics

"उद्धव ठाकरेंच्या रॅलीत हिरवे झेंडे..." देवेंद्र फडवणीस यांचा हल्लाबोल - Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपाला अती आत्मविश्वास नडला, त्याकरता भाजपानं आता सावधपणे पाऊलं उचलायला सुरुवात केलीय. अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देवेंद्र फडवणीसांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीतबाबत महत्वाचा सल्ला दिलाय. तसंच यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray |
देवेंद्र फडवणीस, उद्धव ठाकरे (Source - ETV Bharat)

मुंबई Maharashtra Assembly Election 2024 :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर असून मुंबईतील दादर येथील योगी सभागृहात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, "गाफील राहू नका, अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका", असा कानमंत्र दिला. तसंच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. ते मंगळवारी (1 सप्टेंबर) मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

विकेट पडू देऊ नका :विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत दादर येथील योगी सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या संमेलनात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "गाफील राहू नका, अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका. लोकसभा निवडणुकीत देशात "अब की बार 400 पार" व "राज्यात 45 पार" असा नारा दिला. पण भाजपाला देशात 250 आणि राज्यात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी अति आत्मविश्वास न बाळगता, गाफील न राहता, काम करावं." तसंच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,"विरोधक एकत्र आले आहेत. ते कोणतीही तडजोड करायला तयार आहेत. त्यामुळं आपण सावध राहील पाहिजे."

उद्धव ठाकरेंवर घणाघात : देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलाय. मराठी, हिंदू मतं त्यांच्याकडे नसल्यानं त्यांच्या रॅलीमध्ये आता हिरवे झेंडे पाहायला मिळत आहेत. आपलं सरकार येईल, अशी परिस्थिती आहे. आतापर्यंत महायुती सरकारनं केलेल्या कामांमुळे जनता आमच्या पाठीशी आहे. राज्यात 3 कोटीपेक्षा अधिक सरकारचे लाभार्थी असून त्यांची मतं मिळाली तर, आपलं सरकार पुन्हा येईल," असा आत्मविश्वास सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

हेही वाचा

  1. "महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते निराशेत"; खुद्द अमित शाहांचीच कबुली, म्हणाले, स्वबळावर... - BJP Mumbai meeting
  2. देवेंद्र फडणवीस घाबरलेत; भाजपा 60 जागांच्या पुढे जाऊ शकत नाही, रोहित पवारांची भविष्यवाणी - Rohit Pawar On Devendra Fadnavis
  3. "महाराष्ट्राचा बैल बाजार...", राऊतांच्या टीकेचा सदाभाऊ खोत यांनी घेतला समाचार - Sadabhau Khot On Sanjay Raut

ABOUT THE AUTHOR

...view details