मुंबई : काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणूक 2024 साठी आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 16 उमेदवारांना काँग्रेसनं स्थान दिलं आहे. याआधी काँग्रेसनं दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या होत्या. आता तिसही 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
काँग्रेसची दुसरी यादी : विधानसभा निवडणुकीसाठी याआधीच काँग्रेसकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. यात 23 जणांची नावं जाहीर करण्यात आली. जळगाव- जामोदममधून स्वाती विटेकर, सावनेरमधून अनुजा केदार, भंडाऱ्यातून पूजा ठावकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काही विद्यमान आमादारांचाही पत्ता कट करण्यात आला होता.
काँग्रेसची दुसरी यादी :
१. भुसावळ- राजेश मानवतकर
२. जळगाव, जामोद- स्वाती विटेकर
३. वर्धा- शेखर शेंडे
४. सावनेर- अनुजा केदार
५. नागपूर दक्षिण- गिरीश पांडव
६. कामठी- सुरेश भोयर
७. भंडारा- पूजा ठावकर
८. अर्जुनी मोरगांव- दिलीप बनसोड
९. आमगाव- राजकुमार पुरम
१०. राळेगाव- वसंत पुरके