महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

भाजीवल्यानं भरला अपक्ष उमेदवारीचा अर्ज, मागं घेण्यासाठी पैशाचं आमिष-धमकी; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - lok sabha election - LOK SABHA ELECTION

South Mumbai Lok Sabha Constituency : भाजीपाला विक्रेता प्रशांत घाडगे यांनी दक्षिण मुंबईतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक आयोगात अर्ज दाखल केला. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी धमकी दिल्याप्रकरणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

भाजीवल्यानं भरला अपक्ष उमेदवारीचा अर्ज, मागं घेण्यासाठी पैशाचं आमिष दाखवत धमकावल्यानं शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
भाजीवल्यानं भरला अपक्ष उमेदवारीचा अर्ज, मागं घेण्यासाठी पैशाचं आमिष दाखवत धमकावल्यानं शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 10:54 PM IST

मुंबई South Mumbai Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा अवघ्या काही दिवसांवर आला असून मुंबई शहरात राजकीय उलाढाली मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाच्या विभागप्रमुख आणि पक्ष सचिवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कफ परेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय दंड संविधान कलम 171 ई, 188 आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950, 1951, 1989 कलम 123(1) (अ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दोन लाख देत उमेदवारी परत घेण्याचा आग्रह : मुंबई दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रशांत घाडगे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी दीपक पवार आणि वैभव थोरात यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अपक्ष उमेदवार प्रशांत प्रकाश घाडगे यांनी याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रशांत घाडगे हे भाजीपाला विक्रेता असून त्यांनी दक्षिण मुंबईतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक आयोगात अर्ज दाखल केला. मात्र सहा मे रोजी त्यांना वर्गमित्र दीपक पवार यांचा फोन आला आणि चर्चेदरम्यान त्यानं इलेक्शन संदर्भात बोलायचं असल्याचं सांगितलं. यानंतर तक्रारदार प्रशांत घाडगे हे ठरलेल्या ठिकाणी भेटले असता दीपक तेथे अगोदरच कोणासोबत तरी फोनवर बोलत हजर होता. त्यावेळी तक्रारदार प्रशांत यांना मनात शंका उत्पन्न झाली आणि भीती वाटल्यानं स्वसंरक्षणाच्या हेतूनं मोबाईल फोनमधील रेकॉर्डिंग चालू ठेवलं होतं. दीपकचं बोलणं संपल्यानंतर, "क्या प्रशांत मुझे पता चला है की, तूने लोकसभा इलेक्शन के लिए फॉर्म भरा है और उसी सिलसिले मे मै दो-तीन दिन से मिलने की कोशिश कर रहा हू लेकिन तू मिलता ही नही." असं बोलल्यावर तक्रारदार प्रशांत यांनी कामाचं काय आहे ते बोल असं सांगितलं. त्यावर दीपकनं "दोन लाख रुपये लेले और अपना अर्जी वापस लेले, क्यू सर पे टेन्शन रख रहा है" त्यावर तक्रारदार हे संतापले आणि दीपकनं दिलेली ऑफर नाकारली. तक्रारदार प्रशांत हे तेथून निघत असताना वैभव थोरात याने तक्रारदार प्रशांत यांना यापेक्षा जास्त अपेक्षा असेल तर रात्री दहा वाजता ऑफिसला यामिनी जाधव मॅडमशी भेट करून देतो असे म्हणाला. त्यावर तक्रारदार प्रशांत घाडगे यांनी मी माघार घेणार नाही, असं ठाम मत व्यक्त केलं.

कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल : ही सर्व चर्चा जवळपास अर्धा ते पाऊण तास चालली. मात्र ही सर्व चर्चा तक्रारदार प्रशांत घाडगे यांनी फोन मध्ये रेकॉर्ड केली होती. आपल्या समर्थकांमध्ये गैरसमज पसरु नये म्हणून प्रशांत घाडगे यांनी 7 मे रोजी व्हाट्सअप द्वारे ही रेकॉर्डींग आपल्या मित्रांना पाठवली. त्यानंतर 8 मे रोजी दीपक पवार यानं तक्रारदार प्रशांत घाडगे यांना फोनवर फोन करण्यास सुरुवात केली. मात्र फोन न उचलल्यानं काही वेळानं दीपक पवार तक्रारदार यांच्या घराबाहेर हजर झाला आणि तक्रारदार यांना बाहेर बोलावून वायरल केलेले ऑडिओ क्लिप डिलीट करण्यास धमकावलं. त्याप्रकरणी कॉल रेकॉर्डिंग पेन ड्राईव्ह मध्ये जतन करुन पोलिसांना देऊन तक्रारदार प्रशांत घाडगे यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर या तक्रारीवरून कफ परेड पोलीस ठाण्यात आरोपी वैभव थोरात आणि दीपक पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मला या एफआयआर बाबत काहीही माहिती नाही." - यामिनी जाधव, महायुती उमेदवार, दक्षिण मुंबई

याप्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही : दरम्यान, दक्षिण मुंबई येथील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं की, "माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मला या एफआयआर बाबत काहीही माहिती नाही."

हेही वाचा :

  1. "...हे शहाणपणाचं लक्षण नाही", शरद पवारांची जोरदार पंतप्रधान मोदींवर टीका - Sharad Pawar
  2. "पालघर जिल्ह्याचं वाटोळं झालं तरी चालेल, पण निवडणुकीसाठी ...", हितेंद्र ठाकूर यांचा पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप - Hitendra Thakur

ABOUT THE AUTHOR

...view details