प्रतिक्रिया देताना बीआरएस नेते भूषण फुसे चंद्रपूर Lok Sabha Election 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडीची लढत होत आहे. यात काही पक्षांनी "एकला चलो रे चा नारा" दिला आहे. यापैकी एक पक्ष म्हणजे केसीआर यांचा बीआरएस, असं असताना चंद्रपूरात मात्र एक वेगळीच घटना घडली आहे. चंद्रपुरातील एका बीआरएसच्या (BRS) पदाधिकाऱ्यानं चक्क आपल्या पक्षाच्या वतीनं भाजपला पाठिंबा दिलाय.
महाराष्ट्रात बीआरएसची एन्ट्री : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी 2024 ची लोकसभा निवडणुकीत त्यांचा बीआरएस (तेलंगणा राष्ट्र समिती) पक्ष राष्ट्रीय स्तरावर उतरणार असल्याचं संकेत दिलेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी टीआरएसचं नामकरण बीआरएस (भारत राष्ट्र समिती) करण्यात आलं. महाराष्ट्रात याची जोरदार हवा निर्माण करण्यात आली. नांदेड, पंढरपूर, नागपूर या ठिकाणी सभा घेऊन त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. नागपूर सारख्या ठिकाणी एक मोठा बंगला घेऊन प्रदेश कार्यालय थाटण्यात आलं. यावेळी चंद्रपूरात इतर पक्ष, संघटनेत काम करत असणाऱ्या अनेकांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यातील बहुतांश नेत्यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. यानंतर लवकरच कार्यकारिणी जाहीर करून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार होत्या.
तेलंगणात पराभव अन बीआरएसनं गाशा गुंडाळला: अशातच तेलंगणा राज्याच्या निवडणुका लागल्या आणि महाराष्ट्र राज्यातील नियुक्त्या रखडल्या. यात बीआर पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळं मुख्यमंत्री म्हणून केसीआर यांचा पायउतार झाला. तेव्हापासून या पक्षानं महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. तेव्हापासून या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झालीच नाही. तेलंगणा येथील नेते देखील नॉट रीचेबल झाले. नागपुराचे पक्ष कार्यालय देखील बंद करण्यात आले. त्यामुळं नेमकं काय करावं असा प्रश्न येथील जिल्ह्यातील नेत्यांना पडला.
जिल्हा समन्वयकाने केला कारनामा: लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि मित्र पक्षाची एनडीए तर काँग्रेस आणि मित्रपक्षाचे इंडिया आघाडी मुख्य लढत आहे. मात्र, काही पक्षांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. अशातच बीआरएस पक्ष हा स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. या पक्षानं भाजपासोबत जाण्याचा कुठलाही निर्णय घेतला नाही. मात्र, चंद्रपूरातील जिल्हा समन्वयक वमशीकृष्णा अरकिल्ला यानी स्वतःच निर्णय घेत आपल्या पक्षाचा पाठिंबा भाजपाला दिला. भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांनी लिखितरित्या आपण मुनगंटीवार पाठिंबा दिल्याचं त्यांनी म्हटलंय.
भाजपानं काढले प्रसिद्धी पत्रक : भाजपा सारख्या इतक्या मोठ्या पक्षाला ही बाब लक्षात आली नाही याचं आश्चर्य आहे. बिआरएस पक्षाने पाठिंबा दर्शवला असल्याचं सांगत तसे अधिकृत पत्र काढले.
बीआरएसच्या नेत्यांनी घेतला आक्षेप: ही बाब समोर येताच बीआरएसच्या इतर नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. वास्तविक पक्षानं कुणाला नियुक्तीच दिली नाही, तसा लिखित अधिकार दिला नाही, कुठले पद किंवा कार्यकारिणी गठीत केली नाही. सोबत राष्ट्रीय पातळीवर भाजपासोबत कुठलीही युती झाली नाही. असं असनताना जिल्हा समन्वयक वमशीकृष्णा यांनी पाठिंबा दिल्याचं दाखवणं हे बेकायदेशीर आहे. याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, तसेच याबाबतची तक्रार आपण वरीष्ठ नेत्यांकडं करणार असल्याची भूमिका बिआरएसचे नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आहे.
हेही वाचा -
- माढ्याचा उमेदवार मोहिते पाटील कुटुंबातीलच, कधी होणार मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश, खुद्द शरद पवारांनीच सांगितलं - Madha Lok Sabha Constituency
- "भारत-चीन सीमावादावरून पंतप्रधान मोदींनी एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं," माजी केंद्रीय संरक्षणमंत्री पवार काय म्हणाले? - Sharad Pawar
- काँग्रेसला दिली कारल्याची उपमा, तर नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंनाही डिवचलं; चंद्रपूरच्या सभेत मोदींची चौफेर फटकेबाजी - PM Narendra Modi Chandrapur Sabha