अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं साऊथसोबतच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.. रिया चक्रवर्ती मूळची बंगाली कुटुंबातील असून तिचा जन्म बंगळुरूमध्ये झाला आहे. रिया चक्रवर्तीनं तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.. 2009 मध्ये. रिया चक्रवर्ती एमटीव्ही शो 'टीव्हीएस स्कूटी टीन दिवा' मध्ये सहभागी झाली होती.. हा शो रिया चक्रवर्ती जिंकू शकली नाही. पण ती रनर अप राहिली. या शोनंतर रियानं अनेक शो होस्ट केले.. रियानं 2010 मध्ये रिलीज झालेल्या 'बँड बाजा बारात' या चित्रपटात अनुष्का शर्माच्या भूमिकेसाठी ऑडिशनही दिले होते पण तिला यशराजने नाकारले होते.. रिया चक्रवर्तीनं तेलुगू 'तुनिगा-तुनिगा' चित्रपटातून फिल्मी करिअरची सुरुवात केली.. 2013 मध्ये. रियानं 'मेरे डॅड की मारुती' या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.. 'मेरे डॅड की मारुती' हा चित्रपट तिचा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.. या चित्रपटानंतर ती 'सोनाली केबल'. 'दोबारा'. 'हाफ गर्लफ्रेंड'. 'बँक चोर'. 'जलेबी' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली.. रिया चक्रवर्ती सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड होती.. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात रियाचं नाव समोर आलं . तेव्हा तिला अनेक आरोपांनाही सामोरे जावे लागले होते.. आता रियाची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र. बॉलिवूडमध्ये तिचा संघर्ष अजूनही सुरूच आहे.