ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / opinion

चीनमध्ये स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्सची पुनर्रचना : जाणून घ्या काय आहे शी जिनपींग यांची मुत्सद्देगिरी - Chinese Restructuring - CHINESE RESTRUCTURING

Chinese Restructuring : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांनी स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स (SSF) संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही योजना बदलण्यामागं शी जिनपींग यांची काय रणनीती आहे, त्याबाबत निवृत्त मेजर जनरल हर्षा कक्कर यांचा हा विशेष लेख.

Chinese Restructuring
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग
author img

By Major General Harsha Kakar

Published : May 1, 2024, 1:15 AM IST

Updated : May 1, 2024, 8:21 PM IST

हैदराबाद Chinese Restructuring : चीननं स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स (SSF) संपुष्टात आणण्याची 19 एप्रिल रोजी घोषणा केली. ही योजना 2015 मध्ये शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) सुधारणांसाठी मोठ्या धूमधडाक्यात तयार केली होती. या योजनेच्या माध्यमातून शी जिनपींग यांना अभूतपूर्व यश मिळालं होतं. स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्समध्ये (SSF) इतर संस्थांमधून एकत्रित केलेल्या विभागांचा समावेश होता. यात अंतराळ, सायबर, माहिती आणि इलेक्ट्रॉनिक युद्धातील क्षमता वाढवणं ही त्यांची मूलभूत भूमिका होती. आता नव्यानं केलेल्या पुनर्रचनेत स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्समध्ये (SSF) तीन स्वतंत्र शाखांमध्ये विभाजन करण्यात आलं. यात इन्फर्मेशन सपोर्ट फोर्स (ISF), सायबर स्पेस फोर्स आणि एरोस्पेस फोर्स असं म्हटलं जात आहे.

in article image
शी जिनपींग यांची मुत्सद्देगिरी

शी जिनपींग करणार बारकाईनं निरीक्षण :चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांनी स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्समध्ये मोठा बदल केला. यानंतर स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स हे थेट सेंट्रल मिलिटरी कमिशन (CMC) अंतर्गत कार्य करण्यासाठी जोडण्यात आलं. त्यावरशी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील CMC द्वारे बारकाईनं निरीक्षण केलं जाईल. दिवसाच्या शेवटी पीएलएमध्ये शस्त्रे, लष्कर, नौदल, हवाई दल आणि रॉकेट फोर्स तसेच चार स्वतंत्र वर्टिकल विभाग तयार करण्यात आले. यात विद्यमान संयुक्त लॉजिस्टिक सपोर्ट फोर्स यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे नवीन पद्धतीत शी जिनपींग यांच्या देखरेखीखालील समिती स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्सचं बारकाईनं निरीक्षक करणार आहे.

अंतराळ हे युद्धाचे पुढील परिमाण आहे :सायबर, माहिती आणि अवकाश या तीन क्षेत्रात चिनी सरकारसाठी विशेष स्वारस्य असल्याचे विभाग मानले जातात. एप्रिलमध्ये स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्सच्या बाबत घोषणा केली, तरी पुनर्रचनेपूर्वी या विषयावर जोरदार चर्चा झाली नाही. चीनमध्ये अंतिम निर्णय जाहीर होईपर्यंत इतरांना फारसं माहिती नसते. चिनी संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं प्रेस ब्रीफिंगमध्ये सायबरस्पेस फोर्सची भूमिका परिभाषित केली. 'राष्ट्रीय सायबर सीमा संरक्षण मजबूत करणं, नेटवर्क घुसखोरी त्वरित शोधणं आणि त्याचा प्रतिकार करणं, राष्ट्रीय सायबर सार्वभौमत्व आणि माहिती सुरक्षा राखणं आदी बाबत त्यांनी मत केलं. त्यामुळे कोणत्या विरोधकांना सायबर हल्ल्यांना सामोरं जावं लागेल हे CMC ठरवेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. "एरोस्पेस फोर्स ‘सुरक्षितपणे प्रवेश करण्याची, बाहेर पडण्याची आणि खुल्या जागेचा वापर करण्याची क्षमता मजबूत करेल.’ अंतराळ हे युद्धाचं पुढील परिमाण आहे. जगभरात त्याचं महत्त्व वाढत असून भारतासह बहुतेक आधुनिक सशस्त्र दलांना स्वतंत्र स्पेस कमांड आहे. भारताचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी अलीकडंच म्हटलं होतं की, 'अंतराळ विभाग हा समुद्र आणि जमिनीवर आपला प्रभाव टाकेल.'

आधुनिक युद्धात विजय हा माहितीवर अवलंबून :चीनमधील एका दैनिकानं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यात नमूद करण्यात आलं की, 'आधुनिक युद्धात विजय हा माहितीवर अवलंबून असतो. संघर्ष हा यंत्रणांमधील आहे, जो कोणी माहिती श्रेष्ठतेचा आदेश देतो तो युद्धात पुढाकार घेतो.' याबात शी जिनपिंग यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होते की, "आयएसएफ लष्करी आधुनिकीकरणाला गती देऊन सशस्त्र दलांच्या मिशनची प्रभावीपणानं अंमलबजावणी करेल. माहिती क्षेत्रावर वर्चस्व राखण्यासह PLA साठी संप्रेषण आणि नेटवर्क संरक्षणाची जबाबदारी स्वीकारेल. भविष्यातील कोणत्याही युद्धाच्या बाबतीत शत्रूंनी कारवाई करण्यापूर्वी ISF माहितीच्या जागेवर वर्चस्व गाजवण्याच्या हेतूनं आघाडीवर असेल," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. एलएसीवर ग्रे झोन ऑपरेशन्सचा एक भाग म्हणून भारत चिनी माहिती युद्धाचा सामना करत आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेशच्या काही भागांचं नाव बदलणं आणि मीडिया प्लॅटफॉर्मवर चीनी माहिती सादर करणं समाविष्ट आहे. ही कारवाई म्हणजे चीनच्या 'तीन युद्ध' संकल्पनेचा भाग आहेत. यात जनमत, मानसिक आणि कायदेशीर युद्ध समाविष्ट आहे. या युद्धाचं नेतृत्व आता आयएसएफ ISF करणार आहे. स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्सच्या पुनर्रचनेला अनेक कारणं दिली जात आहेत. सध्याचे स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स SSF यशस्वी झालं नाही. त्यामुळे अंतराळ विभाग, सायबर विभाग आणि नेटवर्क विभाग आदी संरक्षण दलातील आणि PLA मधील समन्वय सुधारला नाही.

हेही वाचा :

  1. सेमीकंडक्टरची 'महासत्ता' बनेल भारत! चीनशी होईल काटे की टक्कर - Indian Semiconductor Industry
  2. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवर हल्ले ही लाजिरवाणी बाब; जाणून घ्या काय आहे प्रकरण - Attacks On The CPEC
  3. मैत्रीचा हात पुढे करूनही चिनी नागरिकांवर पाकिस्तानात सातत्यानं हल्ले, यामागे कारण काय? - chinese killed in Pakistan
Last Updated : May 1, 2024, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details