महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

एफबीआयच्या संचालकपदावर मूळ भारतीय वंशाच्या वकिलाची नियुक्ती, कोण आहेत काश पटेल? - KASH PATEL NEWS

ट्र्म्प सरकारनं एफबीआय या अमेरिकेच्या तपास संस्थेच्या संचालकपदी मूळ भारतीय वंशाचे असलेल्या काश पटेल यांची निवड केली. पटेल हे ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.

Kash Patel News
काश पटेल असणार एफबीआयचे नवे संचालक (Source- AP)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2024, 7:19 AM IST

Updated : Dec 1, 2024, 10:02 AM IST

वॉशिंग्टन डीसी- मूळ भारतीय वंशाच्या नागरिकानं पुन्हा एकदा ट्रम्प प्रशासनात मोठ्या पदावर स्थान मिळविलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) कश्यप उर्फ काश पटेल यांची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) पुढील संचालक म्हणून घोषणा केली आहे. एफबीआयचे सध्याचे संचालक क्रिस्टोफर रे यांची 2017 मध्ये 10 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. ट्रम्प प्रशासनानं काश यांचा नावाला पसंती दिल्यानं क्रिस्टोफर यांना लवकरच पद सोडावं लागण्याची शक्यता आहे.

  • काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक आहेत. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी संरक्षण आणि गुप्तचर विभागातील विविध वरिष्ठ पदांवर भूमिका बजाविली. काश पटेल यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्रमकपणं प्रचार केला.

कोण आहेत कश्यप पटेल- काश तथा कश्यप पटेल हे व्यवसायाने वकील आहेत. ते मूळचे गुजराती आहेत. त्यांचा जन्म 1980 मध्ये गार्डन सिटी, न्यूयॉर्क येथे झाला. रिपोर्टनुसार पटेलचे आई-वडील पूर्व आफ्रिकेत वाढले. इदी अमीन हे दक्षिण आफ्रिकेत हुकूमशहा असताना त्यांचे वडील प्रमोद यांनी 1970 मध्ये युगांडा सोडून अमेरिकेत आले. कश्यप पटेल यांनी रिचमंड विद्यापीठात (व्हर्जिनिया) पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले. यानंतर न्यूयॉर्कमध्ये कायद्याची पदवी घेतली. यूकेमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन फॅकल्टी ऑफ लॉचे आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्रमाणपत्र देखील त्यांनी मिळविले. न्यूयॉर्कमधील काही श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांसाठी त्यांनी वकिलीचे काम केले.

सरकारी वकील म्हणून पार पाडली जबाबदारी-काश पटेल यांनी अमेरिका, पूर्व आफ्रिका आणि युगांडा आणि केनियासह जगभरातील अनेक देशात न्यायालयीन खटले लढविले आहेत. त्यांनी मियामी, फ्लोरिडा शहरातील न्यायालयांमध्ये जवळपास नऊ वर्षे वकिली केली आहे. तिथे त्यांनी खून, अंमली पदार्थांची तस्करी आणि आर्थिक गुन्ह्यांसह गुंतागुंतीचे न्यायालयीन खटले हाताळली आहेत. ते चार वर्षे फ्लोरिडा राज्याचे सरकारी वकील होते. तर चार वर्षे फेडरल अॅटर्नी म्हणूनदेखील त्यांनी जबाबदारी पार पाडली.

हेही वाचा-

  1. "अन्यथा अमेरिका दिवाळखोर होईल..."ट्रम्प सरकारमध्ये नियुक्ती होताच एलॉन मस्क यांचा इशारा
  2. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होणार यावर शिक्कामोर्तब, भारताच्या अपेक्षा काय?
Last Updated : Dec 1, 2024, 10:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details