ओटावा :भारत आणि कॅनडा या दोन देशात खलिस्तानवादी निज्जरच्या हत्येवरुन संबंध ताणले गेलेले आहेत. त्यातच आता ब्रॅम्पटन इथल्या हिंदू मंदिरावर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कॅनडा सरकारवर चौहोजुनं टीका होत आहे. कॅनडाच्या विरोदी पक्षनेत्यांनी याप्रकरणी तिव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरावर खलिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी धार्मिक स्वातंत्र्याचं महत्त्व सांगून, "प्रत्येक कॅनेडियन नागरिकांना मुक्त आणि सुरक्षितपणानं धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे," असं सोशल माध्यमांवर नमूद केलं.
पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा केला निषेध :ब्रॅम्प्टन इथल्या हिंदू मंदिरावर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे जगभरातील हिंदू नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच खलिस्तानवादी निज्जर याच्या हत्येमुळे कॅनडा आणि भारतामधील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरात खलिस्तानवाद्यांनी हल्ला केल्यानं पुन्हा हा वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोशल माध्यमांवर निषेध व्यक्त केला आहे. सोशल माध्यमांवर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी लिहलं, की "ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरात झालेला हिंसाचार दुर्दैवी असून त्याचा निषेध आहे. प्रत्येक कॅनेडियन नागरिकांना मुक्त आणि सुरक्षितपणे त्यांच्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे. या मंदिरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तत्काळ कारवाई केल्याबद्दल पोलिसांचे आभार."