न्यूयॉर्क PM Modis US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यूयॉर्क दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी "हम आग की तरह जलाने वाले नही, सूरज की तरह रोशनी देने वाले है." पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानं उपस्थित नागरिकांनी मोठा जल्लोष केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलीच फटकेजाबी केली. दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्क शहरात आयोजित परिषदेत अनेक राष्ट्राध्यक्ष आणि इतर देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली. यात नेपाळचे पंतप्रधान के पी सरमा ओली, कुवैतचे प्रिंसेस शेख सबाह खालेद अल-हमद अल-सबाह अल-सबाह, पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास आदींसह Quad Summit मध्ये सहभागी झालेल्या नेत्यांशी त्यांनी चर्चा केली.
भारतीय वंशाच्या नागरिकांशी साधला संवाद :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमधील भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हम आग की तरह जलाने वाले नहीं, सूरज की किरण की तरह रोशनी देने वाले हैं." त्यांच्या वक्तव्यानं उपस्थित भारतीय वंशांच्या नागरिकांनी मोठा जल्लोष केला. पुढं बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की "जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावत आहे. आज भारत जागतिक आपत्तीला प्रथम प्रतिसाद देणारा देश आहे. भारत आता संधींची भूमी झाला आहे. भारत आता संधींची वाट पाहत नाही, तर तो संधी निर्माण करतो. मागील 10 वर्षात भारतानं प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण केल्या आहेत. जगात दबाव वाढवण्याला भारताचं प्राधान्य नाही, तर जगात प्रभाव वाढवण्याला आता भारताचं प्राधान्य आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांची मैत्री अधिक मजबूत होत आहे. भारत आणि अमेरिकेची मैत्री जागतिक हितासाठी महत्वाची आहे." यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील बोस्टन आणि लॉस एंजेलिस इथं दोन नवीन दूतावास उघडण्याचा निर्णय जाहीर केला.