महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

गाझामध्ये मृत्यूचं तांडव; इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात 18 ठार, पॅलेस्टिनीच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू - air Strikes On Gaza - AIR STRIKES ON GAZA

air Strikes On Gaza : मध्य गाझामध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात 18 जण ठार झाले. इस्रायलच्या सैन्यानं अतिरेक्यांना ठार केल्याचा हवाला देत ऑपरेशन्स सुरू असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं अत्यावश्यक वस्तूंची टंचाई तसंच उपासमारीचा धोका निर्माण झाला आहे.

Al Aqsa Martyrs Hospital
अल अक्सा शहीद रुग्णालय (AP Photos)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 9:48 PM IST

तेल अवी air Strikes On Gaza:रविवारी पहाटे इस्रायली हवाई हल्ल्यात गाझामधील 18 लोक ठार झाले. तसंच पॅलेस्टिनीनं केलेल्या हल्ल्यात तेल अवीव उपनगरात दोन जण ठार झाले. गाझामध्ये सुमारे 10 महिने चाललेल्या युद्धानंतर आणि गेल्या आठवड्यात लेबनॉन आणि इराणमध्ये दोन वरिष्ठ अतिरेकी मारल्या गेल्यानंतर तणाव वाढला आहे. त्या हत्येमुळं इराण आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून बदला घेण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यामुळं युद्धाची भीती निर्माण झालीय.

इस्रायल सूड घेण्याच्या तयारीत :इस्रायलच्या मॅगेन डेव्हिड ॲडोम बचाव सेवाच्या माहितीनुसार,पॅलेस्टिनीनं केलेल्या हल्ल्यात दोन नागरिक ठार झाले आहेत. इतर दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितलं की," हा हल्ला पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी केला होता. आम्ही संशयितांचा शोध घेत आहेत. परंतु यात एकापेक्षा जास्त हल्लेखोर सहभागी असण्याची शक्यता नाही." गेल्या आठवड्यात इराणच्या राजधानीत झालेल्या हल्ल्यात लेबनॉनमधील स्ट्राइकमध्ये हिजबुल्लाचा वरिष्ठ कमांडर आणि हमासच्या सर्वोच्च राजकीय नेत्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इस्रायल सूड घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं गाझामध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे."गाझामध्ये, रविवारी इस्रायनं अल-अक्सा शहीद रुग्णालयाच्या प्रांगणात विस्थापित पॅलेस्टिनींच्या छावणीवर हल्ला केला. त्यात एका महिलेसह चार लोक ठार झाले असून इतर जखमी झाले," असं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

पॅलेस्टिनी अतिरेक्यांना लक्ष्य :इस्रायली सैन्याच्या माहितीनुसार हल्ल्यात पॅलेस्टिनी अतिरेक्यांना लक्ष्य केलं होतं. या अतिरेक्यांनी स्फोट घडवून आणल्याचा इस्रायलचा दावा आहे. देर अल-बालाह रुग्णालय हे मध्य गाझामध्ये कार्यरत मुख्य वैद्यकीय सुविधा देणारे रुग्णालय आहे. इथं हजारो लोकांनी आश्रय घेतला आहे. रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार, देर अल-बालाह जवळील एका घरावर झालेल्या हल्ल्यात एक मुलगी आणि तिच्या पालकांचा मृत्यू झालाय. उत्तर गाझामधील आणखी एका घरावर हल्ला करण्यात आला आहे. त्यात तीन मुलं, त्यांचे पालक आणि आजी यांच्यासह किमान आठ लोक ठार झाले. गाझा शहरातील एका वाहनावर झालेल्या हल्ल्यात आणखी तीन लोक ठार झाले, असं हमास-चालित सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या संस्थेनं सांगितलं.

39 हजार 550 पॅलेस्टिनी ठार : गाझा शहरातील एका शाळा-आश्रयावर शनिवारी इस्त्रायली हल्ल्यात किमान 16 लोक ठार झाले. तर इतर 21 जखमी झाले. पॅलेस्टिनी अतिरेक्यांना नागरी भागात आश्रय दिल्याचा आरोप करणाऱ्या इस्रायलच्या सैन्यानं हमास कमांड सेंटरवर हल्ला केल्याचं सांगितलं. हमासच्या नेतृत्वाखालील अतिरेक्यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये दक्षिण इस्रायलमध्ये केलेल्या अचानक हल्ल्यात सुमारे 1 हजार 200 लोक मारले होते. तसंच सुमारे 250 लोकांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. इस्रायलनं गाझामध्ये सुरू केलेल्या हल्ल्यात किमान 39 हजार 550 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझामधील युद्ध सुरू झाल्यापासून व्याप्त वेस्ट बँकमध्ये इस्रायलच्या गोळीबारात 590 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. बहुतेक इस्रायली हिंसक निषेधादरम्यान ठार झाले. इस्रायलनं 1967 च्या मध्यपूर्व युद्धात वेस्ट बँक, गाझा आणि पूर्व जेरुसलेम काबीज केलं होतं.

'हे' वाचलंत का :

  1. हमासच्या दहशतवाद्यांना आदेश देणाऱ्या हमासच्या नेत्याचा खात्मा, इस्त्रायलकडून प्रथमच पुष्टी - Mohammed Deif killed
  2. हमासचा म्होरक्या टिपला; इस्राईलनं इस्माइल हनीयेहला घरात घुसून 'ठोकलं', अंगरक्षकाचाही खात्मा - Ismail Haniyeh Killed In Tehran
  3. हिजबुल्लाहच्या रॉकेट हल्ल्यात 12 मुलांचा मृत्यू, इस्रायलनं मोठी कारवाई करण्याचा दिला इशारा - Israel warning to Hezbollah

ABOUT THE AUTHOR

...view details