मुंबई - World Obesity Day 2024:हल्लीच्या झटपट आयुष्यात लठ्ठपणा ही समस्या झपाट्यानं वाढत आहे. वाढत्या वजनामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा अनेक समस्या उद्भवतात. यासंदर्भात वैद्यकीय जर्नल 'द लॅन्सेट'नं नुकतेच प्रसिद्ध केलेले आकडे धक्कादायक आहेत. या आकडेवारीनुसार, 1990 ते 2022 पर्यंत, जगभरातील मुला-मुलींमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण चार पटीने वाढलं आहे. सुमारे आठ कोटी भारतीय लोक लठ्ठ आहेत. 2024 पूर्वी केलेल्या एका संशोधनात असं दिसून आलं आहे की जगभरातील प्रत्येक 8 पैकी 1 व्यक्ती लठ्ठ आहे. लठ्ठपणा हे अनेक गंभीर रोग, विकाराचं मुख्य कारण मानलं जातं.
लठ्ठपणा गंभीर समस्या :अमेरिकेतही लठ्ठपणाला 'महामारी' संबोधलं जातं. 'जागतिक लठ्ठपणा दिन' दरवर्षी 4 मार्च रोजी जगभरातील लोकांमध्ये लठ्ठपणाचे हानी आणि त्यापासून बचाव करण्याच्या पद्धतींबद्दल जागरुकता पसरविण्याच्या उद्देशानं साजरा केला जातो. सध्या जगभरात लठ्ठ मुलांमध्ये, किशोरवयीन आणि प्रौढांची एकूण संख्या एक अब्जाहून अधिक आहे. लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, एकट्या भारतात 2022 मध्ये, 5 ते 19 वर्षे वयोगटातील सुमारे 12.5 दशलक्ष मुलांच्या वजनात लक्षणीय वाढ झाली आहे. ज्यामध्ये 7.3 दशलक्ष मुले आणि 5.2 दशलक्ष मुली आहेत. 1990 मध्ये हा आकडा केवळ 0.4 दशलक्ष होता. अहवालानुसार, जागतिक स्तरावर महिलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण दुप्पट आणि पुरुषांमध्ये जवळपास तिप्पट वाढलं आहे.
डॉक्टर काय म्हणतात? :लाइफ हॉस्पिटल, दिल्लीचे फिजिशियन डॉ. अशरीर कुरेशी सांगतात की, ''लठ्ठपणा हा गंभीर आहे. जास्त वजन, आहाराचा प्रकार आणि त्याच्या वापराच्या पद्धतीमुळे लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणा कोणत्याही रोगाची तीव्रता वाढवू शकतो. जास्त वजन वाढल्यामुळे लोकांमध्ये अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. लठ्ठ लोकांमध्ये उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह, उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉल, एचडीएल कोलेस्ट्रॉल कमी, हृदयरोग, डिस्लिपिडेमिया, स्लीप एपनिया, श्वासोच्छवासाच्या समस्या, अनेक प्रकारचे कर्करोग, हाडे आणि स्नायूंशी संबंधित रोगांसह अनेक समस्या निर्माण होतात. इतकेच नाही तर अशा लोकांना पटकन थकवा येणे आणि काहीवेळा त्यांचे दैनंदिन काम करण्यात समस्या येऊ शकतात. याशिवाय काहीवेळा लठ्ठपणामुळेही मानसिक समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणा हा खराब जीवनशैली आणि आहार, खाण्याच्या वाईट सवयींचा अवलंब केल्यामुळे येतो. आहारात फास्ट फूड, मांसाहार, तेलकट आहार आणि अति गोड पेये यांसारखे गोष्टी घेत असल्याचं लठ्ठपणा वाढतो. जास्त प्रमाणात दारू पिणे देखील शरीरासाठी धोकादायक ठरु शकते. शारीरिक हालचालींचा अभाव, कधीकधी आनुवंशिक कारणांमुळे, हार्मोनल समस्यांमुळे, कोणताही रोग आणि त्याच्या उपचारांमुळे, विशेषतः औषधांच्या दुष्परिणामांमुळे लोकांमध्ये लठ्ठपणा वाढतो.
जागतिक लठ्ठपणा दिवस : यंदा हा कार्यक्रम 'चला लठ्ठपणाबद्दल बोलूया आणि...' या विशेष थीमवर साजरा केला जात आहे. यावेळी थीममध्ये नंतरची जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. ज्याचा उद्देश हा आहे की लोक आरोग्य आणि कोणत्याही संबंधित समस्यांवर चर्चा करू शकतात. जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त, ग्लोबल ओबेसिटी अलायन्स आणि युनिसेफ, डब्ल्यूएचओ हे आर्गेनाइजेशन संयुक्तपणे काही कार्यक्रमांचे आयोजित करतात. या कार्यक्रमात लोकांना लठ्ठपणाविषयी जागृत केलं जातं.
हेही वाचा :
- जगभरात एक अब्जाहून अधिक लोक लठ्ठपणाने ग्रस्त : द लॅन्सेट जर्नलचा अभ्यास
- किशोर मानसिक आरोग्य दिन : किशोरावस्थेतील मानसिक आरोग्य समस्यांचे निराकरण करणे महत्वाचे
- पाळीव प्राणी तुमच्या जवळ झोपतात का? जाणून घ्या काय होतं नुकसान