महाराष्ट्र

maharashtra

'जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस 2024'; उपचार अन् लक्षणं काय? - World Lung Cancer Day 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 10:36 AM IST

World Lung Cancer Day 2024 : फुफ्फुसाच्या कर्करोगाशी संबंधित आव्हाने आणि धोके याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 'जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन' दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. कर्करोगाच्या मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी फुफ्फुसाचा कर्करोग एक आहे. फुफ्फुसाचा कर्करोग हा भारतातील सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे.

World Lung Cancer Day 2024
जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस 2024 (File Photo)

हैदराबाद World Lung Cancer Day 2024 : फुफ्फुसाचा कर्करोग हे जगभरात कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. दरवर्षी जवळपास 1.7 दशलक्षाहून अधिक मृत्यूसाठी फुफ्फुसाचा कर्करोग हा आजार जबाबदार आहे. धूम्रपानासारखी घातक व्यसनांमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होणाऱ्यांचे प्रमाण 85% आहे, अशी माहिती 'WHO' नं जाहीर केली होती.

जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस का साजरा केला जातो? : जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी जागरुकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी, जगभरातील नागरिक फुफ्फुसाचा कर्करोगातून ठणठणीत बरे झालेल्या व्यक्तींसाठी उत्सव साजरा करतात. फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे आणि तो दरवर्षी लाखो जीव घेतो. 'WHO' च्या मते, 2020 मध्ये, फुफ्फुसाच्या कर्करोगामुळं 1.8 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला.

फुफ्फुसाच्या कर्करोगाचे दोन मुख्य प्रकार :

1) स्मॉल सेल लंग कॅन्सर (SCLC)

2) नॉन-स्मॉल लंग कॅन्सर (NSCLS)

फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं :

  1. फुफ्फुसाच्या कर्करोगामुळं छाती आणि बरगड्यांमध्ये वेदना होतात.
  2. थकवा आणि भूक कमी होऊ शकते.
  3. श्वसन संक्रमण, श्वासोच्छवासाचा धोका वाढतो.
  4. वजन कमी होणे, कर्कशपणा, सुजलेल्या लिम्फ नोडस् आणि अशक्तपणा.

उपचार :फुफ्फुसाच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन यांचा समावेश होतो. उपचाराची निवड रुग्णाच्या सामान्य आरोग्यावर, रोगाचा टप्पा किंवा व्याप्ती आणि कर्करोगाचा प्रकार यावर अवलंबून असते. वैयक्तिक रुग्णाला मिळणाऱ्या उपचाराचा प्रकार देखील अनुवांशिक तपासणीच्या परिणामांवर आधारित असू शकतो, ज्यामुळे काही फुफ्फुसांच्या कर्करोगांना विशिष्ट औषधांना संवेदनाक्षम बनवणारे उत्परिवर्तन ओळखता येतात.

हेही वाचा -कर्करोगाचं पहिल्याच टप्प्यात होणार निदान; 'टूमोर' ॲपची निर्मिती - Tumoor App For Cancer Diseases

ABOUT THE AUTHOR

...view details