महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

तिशीनंतर निरोगी राहण्याकरिता, महिलांनी करा या 5 पदार्थांचा आहारात समावेश - Diet Plan After 30 For Women - DIET PLAN AFTER 30 FOR WOMEN

Diet Plan After 30 For Women: 30 नंतर महिलांच्या शरीरात बरेच बदल होतात. अशा परिस्थितीत आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी या 5 गोष्टींचा आहारात समावेश करणं खूप फायदेशीर ठरू शकतं.

Diet Plan After 30 For Women
तिशीनंतरचा आहार (Getty Images)

By ETV Bharat Health Team

Published : Sep 27, 2024, 12:10 PM IST

Diet Plan After 30 For Women: वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. हे वय महिलांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या, करिअर, मुलांना सांभाळणं. याकडे कटांक्षाण लक्ष द्यावं लागतं. यामुळे महिलांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. परिणामी महिलांमध्ये मधुमेह, हृदविकार, कर्करोग, अ‍ॅनिमिया, ऑस्टिओपोरोसिस आणि थायरॉईड यासारख्या गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीमध्ये मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी निरोगी आहार घेणं गरजेचं आहे. यामुळे तिशीनंतर महिलांनी आपल्या आहारात काय घ्यावे. याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ज्याचा प्रत्येक स्त्रीने तिच्या रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे.

संपूर्ण धान्य: ओट्स, ब्राउन राईस आणि संपूर्ण कडधान्य फायबरचे उत्कृष्ट स्रोत आहेत. हे पदार्थ ऊर्जा पुरवठा राखतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. तसंच रक्तातील साखरेची पातळी सुरळीत ठेवतात. आहारत फायबरचा समावेश असणं गरजेचं आहे. कारण, यामुळे चयापच व्यवस्थित होते.

दही : दही हे प्रथिने आणि प्रोबायोटिक्सचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. यामुळे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते. हे हाडांसाठी देखील चांगले आहे. सलाड किंवा फळांमध्ये दही मिसळून नाश्त्यात खाऊ शकतो.

हिरव्या भाज्या : मेथी, पालक, शेपू यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे त्वचाही चमकदार होते. यामुळे हाडे मजबूत होतात. तिशीनंतर हाडांच्या समस्या जाणवू लागतात. त्यामुळे आहारात कॅल्शियम असणं गरजेचं आहे. निरोगी राहण्यासाठी महिलांना दररोज 1000 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. भाज्यांचे सूप बनवा किंवा सॅलडमध्ये घालून सेवन करणे उत्तम आहे.

नट आणि बिया :नट्स आणि बियांमुळे असंख्य फायदे होतात. नट, अक्रोड आणि चिया बिया हे ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. हृदयाच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहेत. तसंच नट्स आणि बिया शरीरातील साखरेची पातळी सुरळीत ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहेत. नट्स आणि बियामध्ये फायबर, जीवनसत्त्वं आणि खनिजं भरपूर प्रमणात असतात.

फळ : बेरी, सफरचंद आणि केळी यांसारख्या फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि ऊर्जा वाढवतात. अशा परिस्थितीत, न्याहारीसाठी किंवा नाश्ता म्हणून दररोज फळं आणि भाज्यांचं सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

संदर्भ

https://www.healthline.com/nutrition/weight-loss-in-your-30s

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. हृदयाचे आरोग्य सुरळीत ठेवायच आहे? आहारात करा ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचा समावेश - Omega 3 Fatty Acids
  2. लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा - Iron Rich Foods

ABOUT THE AUTHOR

...view details