महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

सकाळी सूर्यप्रकाशात बसल्यास आरोग्याला होतात अफाट फायदे; जाणून घ्या कोणती वेळ आहे उत्तम

हिवाळ्यातील सकाळच्या सूर्यप्रकाशाने होतात अनेक आरोग्यदायी फायदे; वाचा सविस्तर

Winter Tips
सूर्यप्रकाश घेण्याचे आरोग्यदायी फायदे (ETV Bharat)

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Nov 28, 2024, 11:53 AM IST

Updated : Nov 28, 2024, 12:49 PM IST

Winter Tips: हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमध्ये अनेकांना उन्हात बसायला आवडते. परंतु, धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना उन्हात बसणे शक्य होत नाही. तर कुणी त्वचा काळी पडेल या भीतीनं उन्हात बसणं टाळतात. पण तुम्हाला माहिती आहे का? त्वचा आणि संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकाळची सूर्यकिरणे फार महत्त्वाची भूमिका बजावतात. सकाळी उन्हात बसल्यास रोगप्रतिकार शक्ती सुधारते. तसंच 'व्हिटॅमिन डी' मिळवण्यासाठी आणि स्नायू बळकट करण्यासाठी सूर्यप्रकाश फार महत्त्वाचा आहे. याशिवाय ज्यांना झोपेसंबंधित समस्या आहे त्यांच्यासाठी सूर्यप्रकाश उत्तम उपाय आहे.

एनआयएचने केलेल्या संशोधनानुसार, शरीराला आवश्यक असलेला 'व्हिटॅमिन डी' सर्वात जास्त सूर्याच्या किरणांपासून मिळतो. निरोगी जीवनशैलीसाठी सूर्यप्रकाश फायदेशीर आहे. यामुळे शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य देखील सुधारतं.

  • सूर्यप्रकाश कधी घ्यावा: हिवाळ्यामध्ये अनेकांना सूर्यप्रकाश इतका भावतो की, लोक तासनतास उन्हात बसतात. परंतु, यामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात. जास्त वेळ उन्हात राहिल्यास त्वचेवर ठिपके, डाग तसंच सुरकुत्या येऊ शकतात. तुम्ही हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी 8 ते 11 या दरम्यान सूर्यप्रकाश घ्या. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार हिवाळ्याच्या दिवसांत 'व्हिटॅमिन डी' मिळवण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 2 या दरम्यान सूर्यप्रकाश घ्यावा.
  • सूर्यप्रकाश किती घ्यावा: जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी सकाळी 20 ते 30 मिनिटं सूर्यप्रकाश घ्यावा. जास्तवेळी सूर्यप्रकाशात बसणे हानिकारक ठरू शकते.
  • सूर्यप्रकाश घेताना ही खबरदारी घ्या: सूर्यप्रकाश घेताना त्वचेचं संरक्षण करण्यासाठी कपडे नीट घाला. तसेच त्वचेवर सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.
  • सूर्यप्रकाश घेण्याचे फायदे
  • इम्यूनिटी बूस्ट:सूर्यप्रकाशामुळे इम्यूनिटी बूस्ट होते. तुम्ही सूर्यप्रकाशात राहिल्यास कमी वेळात इम्यूनिटी बूस्ट करू शकता. इम्यूनिटी मजबूत झाल्यास तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता.
  • झोप सुधारते: सकाळी चांगला सूर्यप्रकाश घेतल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. तुम्ही जेवढा वेळ उन्हात घालवाल, तेवढे जास्त शरीरात मेलाटोनिनचं उत्पादन होईल. यामुळे तुम्हाला झोप चांगली येईल.
  • मानसिक आरोग्य सुधारते: सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाश घेतल्यास मानसिक आरोग्य सुधारते. सूर्यप्रकाशातील मेलाटोनिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन तुमच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसंच सूर्यप्रकाशामुळे चिंता तसंच नैराश्याचा धोकाही कमी होतो.
  • हाडे मजबूत होतात:जर नियमित 15 ते 20 मिनिटं सूर्यप्रकाशात घालवले तर हाडे मजबूत होतील.

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC2290997/

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. पिगमेंटेशनमुळे काळवंडलाय चेहरा? अशी करा चुटकीसरशी सुटका
  2. पोशाखानुसार कोणती ब्रा घालावी? तुम्हालाही पडतो प्रश्न; फॉलो करा 'या' टिप्स
  3. वयानुसार दिवसातून किती मिनिटं चालावं? तज्ञ काय म्हणतात
  4. सावधान! तुम्ही पाणी गरम करण्यासाठी रॉड हीटर वापरता का? पडू शकते महागात
Last Updated : Nov 28, 2024, 12:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details