Aloe Vera And Vastu Shastra: बहुतांश लोकं घरात कुंडीमध्ये कोरफड लावतात. यात अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत. डोळे आणि केसांची निगा राखण्यासाठी कोरफड वापरलं जातं. याशिवाय सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी हे एक उत्तम औषध आहे. मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या अतिवापरामुळं डोळे चुरचुरत असतील तर कोरफडीचा रस डोळ्यात घालून डोळे साफ केल्यास आराम मिळतो. परंतु औषधी गुणधर्मांसह वास्तुशास्त्रातही कोरफडीला महत्वाचं स्थान आहे. यामुळे तुमच्या जीवन समृद्ध होऊ शकतं. जाणून घेऊया कोरफडीचे वास्तूशास्त्रातील महत्व.
वास्तुशास्त्रानुसार कोरफड शुभ आणि फायदेशीर वनस्पती आहे. घरामध्ये शांत वातावरण निर्माण करण्यास कोरफड महत्तपूर्ण भूमिका बजावते. घराभोवती रेंगाळणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी कोरफड उत्तम आहे. यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते. शिवाय प्रेम, धन, पदोन्नती आणि प्रगती देखील वाढते. तसंच जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करण्यासाठी कोरफड वनस्पती फायदेशीर आहे.
- हे आहेत फायदे
- कुटुंबात आनंद नांदते: वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोरफडीची लागवड केल्यास आर्थिक समस्या दूर होतात. तसंच आर्थिक उन्नती साधता येते.
- आर्थिक वाढ:वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये कोरफडीची लागवड केल्यास आर्थिक समस्या दूर होतात आणि आर्थिक उन्नती साधता येते.
- सकारात्मकता : कोरफडीमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे घरी कोरफड लावल्यानं सकारात्मकता पसरण्यास मदत होऊ शकते.