ABCDEF Bundle In Critical Care: हृदयविकार रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडे हृदयविकाराचा झटका हे जगातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण बनले आहे. पूर्वी, फक्त वृद्ध लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त होती. परंतु, आता तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अयोग्य जीवनशैली. हृदविकार थांबवण्याकरिता प्रत्येकानं आपल्या दैनंदिन जीवनात आहाराची काळजी घेतली पाहिजे. तसंच शारीरिक हालचाली, वजन नियंत्रण, मद्यपान आणि धूम्रपान यासारख्या काही वाईट सवयी टाळल्या पाहिजेत.
तुमचे वय 20 किंवा 50 पेक्षा जास्त असले तरीही, तुम्ही जीवनपद्धतीत छोटे बदल करून हृदयरोगासारख्या घातक आरोग्य समस्यांचा धोका कमी करू शकता. यावर AIIMS भोपाळ, डॉ. अजय सिंग यांनी माहिती दिली की, हृदयविकारासंबंधित आजार टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत ABCDEF सूत्राचे पालन केलं पाहिजे. चला तर जाणून घेऊया काय आहे ABCDEF सुत्र आणि ते अंगीकारल्यास आपल्या आयुष्यात काय बदल होवू शकतात.
- ABCDEF सूत्र काय आहे:एम्स भोपाळचे डॉक्टर अजय सिंह यांच्या मते, जीवनशैली सुधारण्यासाठी आणि हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी खालील 6 महत्त्वाच्या पैलूंकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
- A (एडिक्शन)दारू आणि धूम्रपान यांसारख्या वाईट सवयी सोडल्या पाहिजेत. कारण दारू आणि सिगारेटच्या सेवनानं हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे निरोगी हृदयासाठी या वाईट सवयी टाळा.
- B (ब्लड प्रेशर)ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाब हे हृदयविकाराचं प्रमुख कारण आहे. हे टाळण्यासाठी, रक्तदाब नियमितपणे तपासणे आणि उपचार घेणे महत्वाचे आहे.
- C (कोलेस्टेरॉल)रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे हृदयासाठी हानिकारक आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल आवश्यक आहेत.
- D (डायबिटीज) डी म्हणजे डायबिटिज (मधुमेह) मधुमेहामुळे लोकांच्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे आणि संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
- E(एक्सरसाइज)हृदयासाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी नियमित एक्सरसाइज करणे आवश्यक आहे. आठवड्यातून 5 दिवस 40 मिनिटे चालणे. याशिवाय योगासनं आणि प्राणायाम केल्यानं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.
- F (फन)कुटुंब आणि मित्रांसह वेळ घालवणे. तणाव कमी करण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे.