What Is Rainbow Diet: आजकाल लोकांमध्ये रेनबो डाएटची क्रेझ वाढली आहे. तुम्हाला माहीत आहे का हा रेनबो आहार काय आहे? तज्ञांच्या मते, जगभरातील लोक रेनबो डाएटचं मनापासून पालन करत आहेत. जाणून घ्या, रोनबो आहाराविषयी सविस्तर माहिती.
रेनबो डाएट म्हणजे काय?
रेनबो आहारामध्ये दररोज वेगवेगळ्या रंगांची फळं आणि भाज्या समाविष्ट असतात. डॉक्टरांच्या मते, शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे सूक्ष्म आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स आवश्यक असतात. ही कमतरता भरून काढण्यासाठी, आपण सर्व प्रकारच्या जीवनसत्त्व आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहार घेतले पाहिजे. पालक, गाजर आणि स्ट्रॉबेरीसारखे रंगीत आणि आरोग्यदायी पदार्थ आपल्या एकंदरीत आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. अशा रंगीबेरंगी पदार्थांनी भरलेलं रेनबो डाएट घेतल्यास आपलं आरोग्य सुधारते.
लाल: रेनबो डाएटमध्ये लाल रंगाचा समावेश करण्यासाठी टोमॅटो, लाल शिमला मिरची, स्ट्रॉबेरी आणि टरबूज यांसारखी फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. लाल अन्न हृदय आणि मूत्रमार्ग निरोगी ठेवण्यास मदत करते.
केशरी: केशरी रंग जोडण्यासाठी गाजर, संत्री, रताळे आणि जर्दाळू यासारख्या फळांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. ते शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. याशिवाय ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
हळद: हळदीच्या रंगाचे पदार्थ डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करतात आणि अनेक प्रकारचे कर्करोग रोखण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतात. पिवळी फळे आणि भाज्यांमध्ये अननस, केळी, पिवळी शिमला मिरची आणि लिंबू यांचा समावेश असू शकतो. जे शरीरासाठी फायदेशीर असते.