महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश

अयोग्य जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब झपाट्यानं वाढत चाललं आहे. यामुळे हृदविकाराचा झटका आणि पक्षाघात होण्याची शक्यता जास्त असते. परंतु, हे टाळण्यासाठी आहारात काही भाज्यांचा समावेश करावा.

Vegetables For High Blood Pressure
Representative Image (Freepik)

By ETV Bharat Health Team

Published : 10 hours ago

Vegetables For High Blood Pressure : बदलत्या जीबनशैलीमुळे बहुतांश लोक उच्च रक्तदाबाचे शिकार होत आहेत. उच्चरक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये सहसा कोणतीही लक्षणं दिसत नाही परंतु निदानास विलंब केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात.

उच्च रक्तदाबाची मुख्य लक्षणं म्हणजे डोकेदुखी, चक्कर येणे, छातीत दुखणे, थकवा आणि धाप लागणे, लठ्ठपणा, झोप न लागणे, धुम्रपान, मद्यपान, मानसिक ताणतणाव आदी आहेत.अस्वास्थ्यकर आहार आणि व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. परंतु योग्य आहार घेतल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येते. त्यासाठी पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि नायट्रेटसारख्या पोषक तत्वांचा समावेश असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे. चला तर मग बघुया कोणकोणत्या भाज्या रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

  • ब्रोकोली: ब्रोकोलीमध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स पुरेशा प्रमाणात असतात. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसंच हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठीही ब्रोकोली फायदेशीर आहे.
  • कोबी:कोबी ही एक भाजी आहे, जी रक्तदाब कमी करण्यास मदत करते. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्यांनी कोबीचा आहारात समावेश करणं चांगलं आहे.
  • गाजर:गाजर पोटॅशियम, बीटा-कॅरोटीन आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहे. हे रक्तदाब कमी करण्यास आणि नियंत्रित करण्यास मदत करते. गाजर खाणं हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगलं असते. त्यामुळे गाजराचा आहारात नियमित समावेश केल्यास तुम्ही एक ना अनेक समस्या दूर करू शकता.
  • बीटरूट: बीटरूट नायट्रेट्सने समृद्ध आहे. हे रक्तवाहिन्यांना आराम देते आणि रक्त परिसंचरण सुधारते. बीटरूट हायपरटेन्शनवर नियंत्रण ठेवण्यासाठीही उत्तम आहे.
  • टोमॅटो:टोमॅटो पोटॅशियमचा समृद्ध स्रोत आहे. त्यात मॅग्नेशियम, फायबर, जीवनसत्त्वे आणि सेंद्रिय संयुग लाइकोपीन देखील असतात. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
  • हिरवी सोयाबीन: हिरव्या बीन्समध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. हिरव्या बीन्समधील फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास देखील मदत करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details