मुंबई - WorldRed Cross Day 2024: दरवर्षी आज 8 मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिवस जगभरात साजरा केला जातो. हा दिवस मानवतेसाठी खूप खास आहे. रेड क्रॉस ही एक संस्था आहे आणि रेड क्रेसेंट ही एक चळवळ आहे. या संस्था एकमेकांशी जोडलेल्या आहेत. रेड क्रॉसद्वारे जगभरातील लोकांच्या मदतीसाठी काही उपक्रम केले जातात. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट चळवळ 1863 मध्ये सुरू झाली आणि स्विस व्यापारी हेन्री ड्युनंट यांच्याकडून प्रेरित होती. रेड क्रॉसची स्थापना हेन्री ड्युनंट यांनी केली होती.
रेडक्रॉस दिवसाचं महत्व : हेन्रीचा जन्म 8 मे 1828 रोजी जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे झाला. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनानिमित्त 8 मे हा जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांना रेडक्रॉस आणि त्याच्या अद्भुत कार्यासाठी नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले आहे. रेड क्रॉस या संस्थेची स्थापना 161 वर्षांपूर्वी म्हणजेच 1863 मध्ये झाली. आज 8 कोटींहून अधिक लोक त्याचे स्वयंसेवक आहेत. जगभरात जवळपास प्रत्येक देशात त्याच्या शाखा आहेत. हा दिवस विविध नैसर्गिक आपत्ती, युद्ध आणि इतर संकटांमुळे पीडित लोकांना मदत करणाऱ्यांना समर्पित आहे. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेच्या निर्णयांनुसार सर्व राष्ट्रांमध्ये शांतता राखणे हा आहे.