Test Necessary before marriage: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुखाचा आणि आनंदाचा आणि तेवढाच महत्त्वाचा क्षण आहे. नात्यात नेहमी गोडवा राहावा, असं सर्वांना वाटते. परंतु लग्नापूर्वी आपण कुंडली, लग्नातील जेवणाचा मेन्यू तसंच कपड्याच्या खरेदीकडे कटाक्षाणं लक्ष देतो. परंतु, या गडबडीत आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. परिणामी बहुतांश लोकांवर काही ना काही कारणांमुळे विभक्त होण्याची वेळ येते. यात दोन जीवांचं नुकसान होत नसून दोन कुटुंब उद्धवस्त होवू शकतात. परंतु, लग्नाआधी काही टेस्ट केल्यास तुम्हाला लैंगिक आजारांचाच धोका कमी होत नाही तर अनुवांशिक आणि प्रजनन रोगांचा देखील खुलासा होतो. यामुळे खाली दिलेल्या चाचण्या प्रत्येक जोडप्यानं कराव्या, असा सल्ला डॉक्टर देतात.
- एसटीडी टेस्ट:प्रत्येक जोडप्यानं लग्नापूर्वी ही टेस्ट करावी. कारण लैंगिक संक्रमित आजार दिसून येत नाही. लग्नांतर जोडप्यांमध्ये नियमित सेक्स होऊ लागतो. यामुळे लग्नानंतर लैंगिक संक्रमित आजारांची लागण होण्याची समस्या उद्भवू नये म्हणून ही चाचणी करणे गरजेचं आहे. तसंच लग्नाआधी सेक्स करणाऱ्यांची तर एसटीडी स्टेस्ट करणं फार आवश्यक आहे.
- जेनेटीक टेस्ट:लग्नापूर्वी सर्वांनी नेजेटिक टेस्ट करायलाच हवी. कारण या टेस्टमुळे तुम्ही तुमच्या बाळांना काही अनुवांशिक धोक्यांपासून वाचवू शकता. तसंच या चाचणीमुळे आपल्या साथीदाराला भविष्यात अनुवांशिक रोग होवू शकतो काय? याची माहिती मिळते. ही टेस्ट केल्यास एखाद्या रोगाचं निदान झाल्यास त्वरीत उपचार घेता येवू शकतो.
- थॅलेसिमीया:थॅलेसिमीया हा रक्ताशी निगडीत आजार आहे. जोडीदारामध्ये दोघांनाही हा आजार असल्यास भविष्यात मुलांनाही होवू शकतो. मुलांना हा आजार झाल्यात तो गंभीर स्वरूप धारण करू शकते.
- ब्लड टेस्ट:लग्नाआधी ब्लड टेस्ट करणं फार गरजेचं आहे. कारण जोडप्याचं रक्तगट एकमेकांशी सुसंगत नसेल तर गर्भधारणेदरम्यान अनेक समस्या उद्भवू शकतात. विशेषः महिलांनी लग्नाआधी आपली ब्लड टेस्ट करावी.
- मानसिक चाचणी: लग्नाआधी किंवा लग्नानंतर मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करणं फार महाग पडू शकते. मानसिक आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. तुम्हाला काही मानसिक त्रास असल्यास तुम्ही मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या. यामुळे तुमचं वैवाहीक जीवन चांगलं राहिलं.
- अंडाशयाची चाचणी: वाढत्या वयामुळे तसंच इतर कारणांमुळे अंड्यांचे उत्पादन कमी होवू लागते. यामुळे मुलं होण्यास त्रास होतो. परिणामी विभक्त होण्याची वेळ येवू शकते. यामुळे ही टेस्ट करणे फार महत्त्वाचे आहे.
- वंध्यत्व चाचणी:पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या मोजण्यासाठी ही चाचणी केली जाते. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी आढळल्यास ती वाढवता येते. म्हणून पुरुषांची ही टेस्ट करावी. यामुळे भविष्यातील संभाव्य धोके टाळता येवू शकतात.
- पॅप स्मीयर चाचणी:महिलांमधील सर्व्हायकल कॅन्सरचा धोका निश्चित करण्यासाठी पॅप स्मीयर चाचणी केली जाते.
- एचआयव्ही चाचणी:लग्नापूर्वी प्रत्येक जोडप्यानं एचआयव्हीची चाचणी करावी. कारण दोघांपैकी एकाला एचआयव्ही असल्यास दोघांचेही आयुष्य उद्ध्वस्त होवू शकते. त्यामुळे लग्नाआधी एचआयव्हीची चाचणी करणं अत्यंत आवश्यक आहे. कोणतीही लाज न बाळगता दोघांनीही न चुकता एचआयव्हीची चाचणी करावी.