हैदराबाद Neck Pain Relief : दिवसभर लॅपटॉप, मोबाइल आणि कम्प्युटरच्या वापरामुळे मान सतत वाकलेली राहते यामुळे मानेच्या दुखण्याची समस्या वाढत चालली आहे. एकाच स्थितीत जास्त वेळ बसणं हे मानदुखीमागील प्रमुख कारण आहे. वीस ते तीस वयोगटातील लोकांमध्ये मानेचा सर्वाधिक त्रास दिसू लागला आहे. अनेकांना अचानक मानदुखीची सुरुवात होते. कालांतरानं वेदना वाढतात. यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवतात. जसं की, संधिवात, डिजनरेटिव्ह डिस्क रोग, स्थायूंची ताकद कमी होणं, तणाव आणि झोप न लागणं. आज याच समस्येपासून सुटका मिळावी म्हणून काही टिप्स देत आहोत. अमेरिकेतील हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगचे एडिटर-इन-चीफ डॉ. हॉवर्ड ई. लेविन यांनी मानदुखी कमी करण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. यामुळे मानेचा त्रास काही प्रमाणात कमी करता येवू शकतो.
मानदुखीपासून मुक्त कसं व्हावं?
- जास्त वेळ एकाच स्थितीत बसू नका : 8 ते 10 तास बसून काम करणाऱ्यांनी एकाच स्थितीत बसून काम करु नये. अर्धा-अर्धा तासानं चालावं आणि थोडा वेळ उभं राहावं, असं केल्यास मानदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.
- काही ऍडजस्टमेंट करा : काम करताना डोळे सरळ संगणकावर आणि लॅपटॉपवर ठेवा. यामुळे आपण सरळ पुढे पाहतो आणि आपली मान चांगल्या स्थितीतमध्ये राहते. कान आणि खांद्यामध्ये मोबाइल ठेवून कधीही बोलू नका.
- चष्मा असल्यास, कालावधीनुसार ते तपासण्यास विसरू नका. योग्य चष्मा न घातल्यास बरेच लोक आपली मान मागे वाकवतात. त्यामुळे मानदुखी वाढते.
- झोपताना जास्त उशा वापरू नका. जास्त उशा डोक्याखाली ठेवून झोपल्यानं मानेची हालचाल कमी होते. परिणामी मान दुखते.
- कोणतीही जड वस्तू उचलण्यापूर्वी, त्याचा तुमच्या मानेवर आणि पाठीवर परिणाम होणार नाही याची खात्री करून घ्या.
- रात्री पुरेशी झोप घ्या. कारण निद्रानाशामुळे स्नायू दुखण्यासह विविध आजार होतात. मसाज आणि मालिश केल्यानं मानदुखीपासून आराम मिळतो.
संदर्भ