महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

मीठ खाण्याचे दुष्परिणाम; दिवसभरात किती मीठ खावं! वाचा - Side Effect Of Consuming Salt - SIDE EFFECT OF CONSUMING SALT

Side Effect Of Consuming Salt : मिठाचं अतिसेवन केल्यास आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळे मीठ प्रमाणात खावं असं नेहमी सांगितलं जातं. चला तर जाणून घेऊयात जास्त मीठं खाल्लं तर नेमकं काय होतं?

Side Effect Of Consuming Salt
मीठ खाण्याचे फायदे कमी, तोटे जास्त (ETV Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Aug 28, 2024, 1:56 PM IST

Updated : Aug 28, 2024, 3:27 PM IST

हैदराबाद Side Effect Of Consuming Salt : जेवणाला चव आणणारा पदार्थ म्हणजे मीठ. पदार्थामध्ये कितीही सामग्री असू द्या त्यात पुरेसं मीठ नसेल तर पदार्थ चविष्ट लागत नाही. परंतु बहुतांश लोक गरजेपेक्षा जास्त मीठ खातात. खाद्यसंस्कृतींचा अविभाज्य घटक असलेल्या मीठाचं नियमित किती सेवन करावं हे कित्येकाला माहीत नसतं. मिठाला व्हाईट गोल्ड असंही म्हटलं जातं. परंतु शरीरात मीठाचा अतिरेक झाल्यास अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखं आहे. यामुळे दररोज किती प्रमाणत मीठ खावं. याबद्दल डॉ. वुक्कला राजेश यांनी माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया मीठ सेवनाचे परिणाम.

  • मीठ खाण्याचे दुष्परिणाम
  1. उच्च रक्तदाब : शरीरात मिठाचं प्रमाण वाढलं तर उच्चरक्तदाबासारखी गंभीर समस्या होवू शकते. उच्चरक्तदाबाची समस्या उद्भवल्यामुळे हृदयविकाराची शक्यता जास्त असते. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार मिठाच्या अतिसेवनामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्या उद्भवतात.
  2. मूत्रपिंडावर भार : शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्यासाठी मूत्रपिंड महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मिठाच्या अतिसेवनामुळे वारंवार लघवीला जावं लागतं. याशिवाय लघवीचा रंगही गडद होतो. मूत्रपिंडावर भार पडतो परिणामी किडनी खराब होऊ शकते.
  3. थकवा आणि अशक्तपणा: डॉक्टरांच्या मते, जास्त मीठ खाल्ल्यानं अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो. यामुळे कामावर लक्ष केंद्रीत करता येत नाही. तसंच शरीराचं संतुलन बिघडते.
  4. हाडांवर परिणाम :मिठाच्या अतिसेवनामुळे शरीरातील कॅल्शिअम कमी होते. त्यामुळे कालांतराने हाडे कमकुवत होण्याची शक्यता जास्त असते. तसंच ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चरची सारख्या समस्या वाढू शकतात.
  5. वजन वाढतो :मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरातील कॅलरीजचं प्रमाण वाढतं. त्यामुळे शरीरातील चरबीही वाढते. परिणामी लठ्ठपणा वाढतो.
  6. वारंवार तहान लागणे : मीठ अधिक प्रमाणात खाल्ल्यानं शरीरातचं संतुलन बिघडतं. यामुळे तुम्हाला वारंवार तहान लागते.
  7. चेहऱ्यावर सूज : शरीरीत मिठाचं प्रमाण अधिक झाल्यास हात पाय, चेहऱ्यांवर सूज येऊ शकते.
  • ही घ्या खबरदारी :तज्ञांच्या मते, आजारांपासून दूर राहण्यासाठी आपण आपल्या जेवणातील मिठाचं प्रमाण कमी केलं पाहिजे. यासोबतच ताजी फळं आणि भाज्या घ्याव्यात, त्यामध्ये असलेलं नैसर्गिक मीठ शरीरासाठी चांगलं असतं. अधिक पाणी प्यायल्यानं शरीरातील अतिरिक्त मीठ निघून जाते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )

हेही वाचा

  1. चाळीशीत वजन घटवायचंय? आजच फॉलो करा 'या' टिप्स; वजन होईल झपाट्यानं कमी - weight Loss After 40 Age
  2. युरिक ॲसिड समस्येनं त्रस्त आहात? मग 'या' पदार्थांना करा बाय-बाय - Uric Acid Reducing Foods
Last Updated : Aug 28, 2024, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details