महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

86 वर्षाचे असून सुद्धा फिट होते रतन टाटा: जाणून घ्या फिटनेसचं रहस्य - RATAN TATA A FITNESS INSPIRATION

Ratan Tata Fitness Secrets: रतन टाटा 86 वर्षाचे असून देखील एकदम फिट होते. त्यांचा फिटनेसचा रहस्य माहिती करून घेऊ. वाचा सविस्तर.

Ratan Tata Fitness Secrets
उद्योगपती रतन टाटा (ANI)

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Oct 10, 2024, 1:20 PM IST

Updated : Oct 10, 2024, 2:55 PM IST

Ratan Tata Fitness Secrets:टाटा समूहाचे माजी चैयरमॅन आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. रतन टाटा असे एकमेव उद्योगपती होते ज्यांनी आपल्या संपत्तीचा जास्तीत जास्त हिस्सा दान केला. दयाळू, देशप्रेमी, दानशूर आणि दिलदार उद्योगपती म्हणून त्यांची ओळख आहे. टीसीएस सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलं. त्यांच्या निधनामुळं देशभरात शोककळा पसरली आहे.

रतन टाटा 86 वर्षांचे असून सुद्धा अगदी फिट होते. ते आहार आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यायचे. सकाळी लवकर उठणे आणि मेडिटेशन करणं हा त्यांचा नित्यनियम होता. ते नेहमी घरचं जेवण करत असत. घरचं जेवण त्यांना जास्त आवडीचं होतं. ते जंक आणि फास्ट फूडच्या खूप दूर होते. जेवणासंबंधित नियम ते काटेकोरपणे पाळायचे.

  • पारसी जेवण पहिली आवड: रतन टाटा यांनी अनेक टिव्ही मुलाखतींमध्ये सांगितलं की त्यांना पारसी जेवण अधिक प्रिय आहे. पारशी जेवण आरोग्य तसंच चव या दोघांनी परिपूर्ण आहे.
  • आवडती डाळ: पारशी जेवणासोबतच त्यांना मसूर डाळ खायला आवडत असे. ते आवडीनं मसूर डाळ खायचे. मसूर डाळीमध्ये शरीराला आवश्यक अनेक पोषक घटक असतात. ज्याचा नक्कीच त्यांच्या शरीराला फायदा झाला.
  • नाश्त्यातील आवडती डिश : रतन टाटा यांना अकुरी ही पारशी डिश फार आवडायची. अकुरी ते आवडीनं खात असतं. अकुरी दिसायला अंडा भूर्जी सारखी असते.
  • रतन टाटा यांची दिनचर्या
  • सकाळी लवकर उठणे : रतन टाटा नेहमी लवकर उठायचे. त्यांची सकाळ सहा वाजताच व्हायची. त्यानंतर मॉर्निंग वॉकला जायचे. नंतर ते योगा आणि व्यायाम करत असत. शरीर निरोगी ठेवायचं असेल तर चालणं, योगा करणं तसंच शारीरिक हालचाली करणं यांची आवश्यकता असते याची त्यांना जाण होती. शिवाय ते नियमित सूर्य नमस्कार देखील करत असत.
  • मेडिटेशन : रतन टाटा न चूकता दररोज मेडिटेशन करायचे. धावपळीच्या जीवन आणि कामाच्या व्यापामुळे शरीर आणि मन थकून जातं. यामुळं शरीराला विश्रांतीची गरज असते. मेडिटेशन केल्यामुळं मन शांत होते. मनुष्य शांतपणे विचार करू शकतो.


(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)


हेही वाचा

रतन टाटांचं असंही श्वानप्रेम! चक्क लाडक्या श्वानासाठी रद्द केली प्रिन्स चार्ल्सची भेट; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

Last Updated : Oct 10, 2024, 2:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details