हैदराबाद Physical activity :शरीर निरामय आणि सुदृढ रहावे ही सर्वांची इच्छा असते. त्यासाठी नियमित व्यायाम हा एकमेव उपाय आहे. शरीरात स्फूर्ती आणि उर्जा टिकून रहावी यासाठी व्यायामच मदत करू शकतो. मात्र, व्यायाम करताना तज्ज्ञांचे काही सल्ले पाळले तर व्यायामाचे फायदे द्विगुणित होऊ शकतात. डॅाक्टरांच्या काही टिप्स आपल्याला कामी पडू शकतात.
आठवड्यातील 150 मिनिटे मध्यम-तीव्रतेचा एरोबिक व्यायाम :एरोबिक व्यायाम वृद्धांसह सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी फायदेशीर आहे. NIH नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, दर आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम-तीव्रतेचा एरोबिक व्यायाम करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. त्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारेल. तसंच घामाद्वारे शरीरातील अशुद्धता बाहेर टाकली जाईल. हा व्यायाम आपल्याला एकाच वेळी करण्याची आवश्यकता नाही. आठवड्यातील सात दिवसांमध्ये या व्यायामाची प्लानिंग करता येते. स्नायू बळकट करण्यासाठी एरोबिक व्यायम फायदेशीर ठरतो.
वृद्धांनी दररोज या 5 टिप्सना प्राधान्य द्यावं :जेव्हा तुम्ही व्यायाम सुरू करता तेव्हा सात दिवस नियमितपणे शारीरिक हालचाली करण्यासाठी प्रेरित राहण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर व्यायाम किंवा शारीरिक हालचाली करण्यात घालवलेला वेळ वाढवा. परंतु लक्षात ठेवा की कोणताही नवीन किंवा वेगळा व्यायाम सुरू करण्यापूर्वी, तुमच्या डॉक्टरांशी नक्कीच बोला. सर्व प्रौढांनी, विशेषत: वृद्धांनी दररोज या 5 टिप्सला प्राधान्य द्यावं.
- फेरफटका मारावा :वयानुसार स्नायू कमकुवत होतात. त्यामुळं अवघड व्यायाम करणं कठीण वाटतं. वृद्धांनी अवघड व्यायाम करण्यापेक्षा फिरायला जावं. अतिरिक्त बसणं आणि झोपणं टाळावं.
- स्वतःची कामे स्वतः करा : डॉक्टरांच्या मते, इतरांवर अवलंबून न राहता शक्य तितके स्वतःचं काम स्वतः करा. मुलांबरोबर खेळा. सकस आहारासोबतच व्यायाम करा. यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या आरोग्य समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होवू शकते.
- सकस आहार आणि व्यायामाची दिनचर्या साध्य करण्यासाठी उद्दिष्टे निश्चित करा.
- आठवड्यातील सात दिवस कमीत कमी 30 मिनिटं शारीरिकरित्या सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा.
- आहारात नियमित फळं आणि भाज्या घ्या.
- संपूर्ण धान्य, कमी चरबीयुक्त प्रथिने आणि दुग्धजन्य पदार्थाचा आहारात समावेश करा.
- साखर, सॅच्युरेटेड फॅट आणि मीठ कमी असलेले पदार्थ खाणे चांगले असते.
- नियमित व्यायाम केल्यानं शारीरिक आरोग्य आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते.