महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

नॉन-स्टिक भांडी वापरणाऱ्यांनो सावधान! संशोधनात आढळले धक्कादायक वास्तव - NON STICK PAN HARMFUL FOR HEALTH

स्वयंपाक घरातील पारंपारिक भांड्यांची जागा आता नॉन-स्टिक भांड्यांनी घेतली आहे. अन्न शिजवण्याची प्रक्रिया सोपी करणारे हे भांडे मात्र शरीरासाठी घातक असल्याचं एका संशोधनातून सामोर आलं.

NON STICK PAN CAUSE  NONSTICK CAUSE MANY DISEASES  NON STICK PAN HARMFUL FOR HEALTH
नॉन-स्टिक भांड्यांचे दुष्परिणाम (Freepik)

By ETV Bharat Health Team

Published : Feb 24, 2025, 12:24 PM IST

Non Stick Pan Harmful For health:पूर्वी स्वयंपाक करण्यासाठी मातीच्या भांड्याचा उपयोग केला जात असे. आधुनिक काळात मातीच्या भांड्यांची जागा लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम आणि स्टीलनं घेतली. काळानुसार भांडी बदलत गेली. हल्ली नॉन-स्टिक भांड्यांचा ट्रेड वाढला आहे. बऱ्याचं जणांच्या किचनमध्ये अन्न शिजवण्यासाठी नॉन-स्टिक भांडी वापरली जात आहेत. कारण या भांड्यांमध्ये अन्न शिजवणं सोपं असतं. तसंच तेलाचा कमीत कमी वापर करूनही यात अन्न चिकटत नाही हे विशेष. परंतु तुम्हाला माहिती आहेत काय ही नॉन-स्टिक भांडी तुमच्या आरोग्यासाठी किती घातक आहेत?

नॉन-स्टिक भांड्यांचे दुष्परिणाम (Freepik)
  • संशोधन काय म्हणतं?

नुकत्याच केलेल्या एका संशोधनात असं आढळून आलं की, नॉन-स्टिक भांड्यांचा उपयोग करताना जपून करणे आवश्यक आहे. कारण, ही भांडी तापत असताना त्यावरील थर हळूहळू निघू लागतो. एखाद्या वेळी चम्मच अथवा इतर कारणांस्तव भांड्यावरील कोटिंगवर एक ओरखडा जरी पडला तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. कारण, या एका ओरखड्यामुळे नॉन-स्टिक कोटिंगच्या थरातील लाखो मायक्रोप्लास्टिक आणि विषारी घटक अन्नात मिसळली जावू शकतात. ज्यामुळे आरोग्याविषक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

नॉन-स्टिक भांड्यांचे दुष्परिणाम (Freepik)

ऑस्टेलियात केलेल्या संशोधकांना असं आढळून आलं की, या भांड्यामधून पीएफओए नावाचं रसायन बाहेर पडते. जे एक कृत्रिम प्लास्टिक आहे. तसंच हे कार्बन आणि प्लोरिन अणूंनी बनलेलं असते. जे कर्करोग, वंधत्व, थायरॉईड, यकृत, तसंच मूत्रपिंडांसारख्या आजारांचा धोका वाढते. संशोधनानुसार नॉन-स्टिक कोटिंगच्या एका ओरखड्यामधून 9000 विषारी मायक्रोप्लास्टिक निघतात. तर, कोटिंग निघालेल्या भांड्यातून 20 लक्ष मायक्रोप्लास्टिक निघतात.

  • तज्ञ काय म्हणतात?

स्वयंपाक खोली आता हायटेक स्पेस बनली आहे. बहुतेक जण स्टील, ॲल्युमिनियम, लोखंडी, पितळी तसंच नॉन स्टिकची भांडी वापरण्यास प्राधान्य देत आहेत. नॉन स्टिकची भांडी अन्न जास्तवेळ गरम आणि ते टिकवण्यासाठी वापरले जाते. परंतु, यांचे विपरीत परिणाम देखील आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि राष्ट्रीय पोषण संस्था (NIN) यांनी अलिकडेच केलेल्या एका संशोधनात भारतीयांसाठी आहाराविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यात त्यांनी मातीच्या भांड्याच्या सुरक्षिततेवर तसंच फायद्यांवर भर दिला.

आरोग्यासाठी कोणती भांडी चांगली (ICMR)
  • कोणती भांडी वापरणं फायदेशीर?
  • मातीच्या भांड्याचे फायदे: मातीच्या भांड्यात अन्न शिजवणं सुरक्षित आहे. मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास तेल कमी लागते. तसंच हे पर्यावरणास अनुकूल देखील आहेत. त्याचबरोबर अन्नाचे पौष्टिक मूल्य जसेच्या तसे ठेवण्यास देखली ते फायदेशीर आहेत. मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास अन्नातील पोषक तत्वे टिकून राहतात. तसंच मातीच्या भांड्यातून फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह यासारखे पोषक घटक देखील मिळतात.
  • स्टीलची भांडी: स्टीलची भांडी योग्य प्रकारे वापरण्यात आली तेव्हाच ती स्वयंपाकाकरिता सुरक्षित आहेत. प्रतिरोधकता, टिकाऊपणा आणि खाद्यपदार्थांसह अनेक फायद्यांमुळे अनेक स्वयंपकाघराती स्टीलची भांडी वापरली जात आहेत. ही भांडी अल्कधर्मी किंवा अम्लीय पदार्थांसह विरघळत नाही. यामुळे शिजवलेल्या अन्नात धातूंची चव किंवा हानिकारक घटक अन्नात मिसळत नाही.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S004896972205392X?fbclid=IwY2xjawImh_BleHRuA2FlbQIxMAABHUwAiFtLlaVkdFcZ5cSxJVoD1WCQeJuP6Y86WfLpKAWeb6bbfpc0Kvpjmg_aem_pqbIa7fr_LMFX3WszbHFbA

https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/28913736/

हेही वाचा

ABOUT THE AUTHOR

...view details