Navratri 2024 Bhog for Each Day:नवरात्री, सर्वात प्रसिद्ध हिंदू सणांपैकी एक, भक्ती, उपवास आणि उत्सवाचा काळ आहे. या नऊ दिवसांमध्ये, भक्त अत्यंत भक्तीभावाने दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा करतात. नवरात्री उत्सवाला आजापासून सुरुवात झाली असून शनिवार 12 ऑक्टोबर रोजी समापन होणार आहे. माता दुर्गेच्या प्रत्येक रुपाचे वेगळे महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात मातेच्या नऊ रुपांना त्यांचं आवडतं नैवेद्य अर्पण केलं जातं. असं केल्यास देवी दुर्गा प्रसन्न होते आणि आपली मनोकामना पूर्ण होतात, असा समज आहे. चला तर जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ दिवशी कोणते नैवेद्य मातेला अर्पण केलं जावं.
- पहिला दिवस माता शैलपुत्री:देवी शैलपुत्रीला देशी तूप फार आवडतं. नवरात्रीचा पहिला दिवस पर्वतांची कन्या, शैलपुत्री मातेला समर्पित आहे. या रूपात माता दुर्गा ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या शक्तींचं प्रतीक आहे. असं मानलं जातं की, जे भक्त पहिल्या दिवशी देशी तूप भोग म्हणून देवीला अर्पण करतात, त्यांचं कुटुंब निरोगी आणि आनंदी राहतं. तुम्ही देशी तूपापासून लाडू, हलवा आणि रबडी बनवू शकता.
- दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणीसाठी साखर:दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. ती तपश्चर्या आणि तपस्याचं प्रतिनिधित्व करते. या दिवशी मातेला साखर अर्पण केली जाते. जी जीवनातील गोडपणा आणि मातेच्या शांत आणि स्थिरतेचं प्रतीक आहे. भोग म्हणून साखर अर्पण केल्यानं भक्तांना त्याचे गुण आत्मसात करण्यास आणि मनःशांती प्राप्त करण्यास मदत होते.
- तिसरा दिवस माता चंद्रघंटासाठी खीर: तिसऱ्या दिवशी, माता पार्वतीचे विवाहित रूप असलेल्या चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. भक्त देवीला खीर अर्पण करतात. अशी मान्यता आहे की, मातेला खीर नैवेद्य अर्पण केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात.
- चौथा दिवस माता कुष्मांडासाठी मालपुआ: नवरात्रीचा चौथा दिवस माता कुष्मांडाला समर्पित आहे. माता कुष्मांडाला तिच्या तेजासाठी आणि अंधार दूर करण्यासाठी ओळखलं जातं. त्यांना खूश करण्यासाठी मालपुआ दिला जातो. असं मानलं जातं की, हे गोड पदार्थ अर्पण केल्यानं समृद्धी, आरोग्य तसंच उज्ज्वल आणि यशस्वी भविष्यासाठी देवीचा आशीर्वाद मिळतो.
- पाचवै दिवस माता स्कंदमातेसाठी केळी :नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी भोग म्हणून केळी अर्पण करणं शुभ मानलं जातं. हे फळ दीर्घायुष्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. असं म्हणतात की देवीला केळी अर्पण केल्यानं भक्तांना यश मिळतं आणि ध्येय साध्य करण्याची शक्ती वाढते.
- सहावा दिवस माता कात्यायनी साठी मध : सहाव्या दिवशी, देवी कात्यायनीची पूजा केली जाते. देवीला प्रसाद म्हणून मध अर्पण केलं जातं. असं केल्यास सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
- सातवा दिवस देवी कालरात्रीसाठी गूळ : सातवा दिवस देवी कालरात्रीला समर्पित आहे. माता दुर्गेचे सर्वात उग्र रूप आहे. जेव्हा पार्वती मातेनं दैत्यांशी लढण्यासाठी आपली सोनेरी त्वचा सोडली, तेव्हा तिनं हे उग्र रूप धारण केलं होतं. या दिवशी भोग म्हणून गुळ अर्पण केल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि भक्तांना संरक्षण आणि शक्ती मिळते.
- आठवा दिवस माता महागौरीसाठी नारळ : माता महागौरी, पवित्रता आणि शांतीचं प्रतीक आहे. माता गौरीची आठव्या दिवशी पूजा केली जाते. तिच्या गोऱ्या रंगामुळे तिला महागौरी हे नाव पडलं. प्रसाद म्हणून नारळ अर्पण केल्यानं भक्तांना मागील पापांची क्षमा मिळण्यास मदत होते. तसंच समृद्ध आणि शांत जीवनासाठी त्यांचे आशीर्वाद मिळतात.
- नऊवा दिवास माता सिद्धिदात्रीसाठी तिळ :नवरात्रीचा नववा आणि शेवटचा दिवस देवी सिद्धिदात्रीला समर्पित आहे. जिने भगवान शिवलाही अनेक सिद्धी बहाल केल्या आहेत असे मानले जाते. या दिवशी तिळाचा नैवेद्य दाखवला जातो. तीळ अर्पण केल्याने सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते असे म्हणतात.