Celebrity inspired dresses for Puja :आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. या दिवशी हिरव्या रंगाला विशेष महत्व असतं. याकाळात सलग नऊ दिवस आपण देवीच्या अर्चनेत घालवतो. या कालावधित आपल्याला मंदिरासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जावं लागतं. अशात आपल्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो वेगळं काय परिधान करावं? जेणेकरून आपण इतरांपेक्षा वेगळे दिसू. मात्र, आता काळजी करू नका. आज बॉलिवूड सेलिब्रिटींच्या परिधानावरून आपण काही टिप्स घेणार आहोत. चला फॉलो करूया त्यांचे नवे ट्रेन्ड्स
दिया मिर्झाचा ग्रीन लेहेंगालूक: जर तुम्ही नवरात्रीमध्ये ग्लॅमरस लूक शोधत असाल तर तुम्ही दिया मिर्झा सारख्या हिरव्या रंगाच्या लेहेंग्यासह स्टेटमेंट ज्वेलरी घालू शकता.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सेलिब्रिटी लूक (Instagram)
मौनी रॉयचा गडद हिरवा लहेंगा: मौनी रॉयने या नवरात्रीत घातलेला गडद हिरवा लेहेंगा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. या वेशभूषेत मौनी खूपच सुंदर दिसत होती.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सेलिब्रिटी लूक (Instagram)
दीपिका पदुकोणचा संपूर्णलूक: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ग्रीन शरारा पॅटर्न सोबत न्यूड लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तुम्हीही नवरात्रीला दीपिकाच्या हिरव्या पारंपारिक साडी आणि तिचा न्यूड लूक फॉलो करू शकता.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सेलिब्रिटी लूक (Instagram)
सोनाक्षीचा इंडो-वेस्टर्न प्रतीकात्मक लूक :तुम्हाला या नवरात्रीत काहीतरी वेगळे आणि अनोखे लूक हवं असेल तर तुम्ही अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा हा सॅटिन ग्रीन इंडो-वेस्टर्न लुक फॉलो करू शकता.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सेलिब्रिटी लूक (Instagram)
अदिती रावची ग्रीन जॉर्जेट अनारकली :अदिती रावचा हिरवा जॉर्जेट अनारकली सूट नवरात्रीच्या लुकसाठी एक योग्य पर्याय आहे. असा ड्रेस तुमच्याकडे असल्यास तुम्ही परिधान करून सुंदर दिसू शकता.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सेलिब्रिटी लूक (Instagram)
आलिया भट्ट बनारसी साडीलूक: नवरात्रीच्या दुस-या दिवशी तुम्ही आलिया भट्टच्या बॉटल ग्रीन बनारसी साडीत गोल्डन लेस वर्क असलेला लुक देखील करू शकता. या हिरव्या साडीत आलिया खूपच सुंदर दिसत होती.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सेलिब्रिटी लूक (Instagram)
माधुरी दीक्षितचा एथनिक ब्लीच निऑन ग्रीन साडीचा लूक :अभिनेत्री माधुरी दीक्षितची सारखी एथनिक ब्लीच निऑन ग्रीन साडी परिधान करून तुम्ही देखील या नवरात्रीमध्ये आकर्षणाचे केंद्र बनू शकता.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सेलिब्रिटी लूक (Instagram)