महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

नवरात्रीचा सातवा दिवस :असा करा आजचा लूक

Navratri Day 7 Colour: नव रात्रीचा सातवा दिवस देवी कालरात्री म्हणजेच महाकाली देवीला समर्पित असतो. आज निळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Oct 9, 2024, 4:47 PM IST

Navratri Day 7 Colour:नवरात्रीचा सातवा दिवस हा कालरात्री म्हणजेच महाकाली देवीच्या उपासनेचा असतो. सुख-समृद्धी आणि शांतीसाठी देवी आशिर्वाद देते. दुर्गा मातेचं हे रूप रात्री काळं आणि मध्यरात्री निळं होते. त्यामुळे या दिवशी निळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. आज आम्ही तुमच्यासाठी बॉलीवूडच्या आकर्षक अभिनेत्रींनी परिधान केलेल्या निळ्या रंगाच्या कपड्यांचे काही पर्याय घेऊन आलो आहोत, जे तुम्ही फॉलो करू शकता.

  • सोहा अली खान शाल मेखेला गाऊन लूक:जर तुम्ही या नवरात्रीत नवा लूक शोधत असाल, तर अभिनेत्री सोहा अली खानचा ड्रेस फॉलो करू शकता. डिझाइन केलेली चादर मेखला गाऊन नवरात्रीत घालण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
सोहा अली खानचा चादर मेखला गाऊन लूक (Instagram)
  • काजलचा बनारसी सिल्क साडी लूक : प्रत्येक स्त्री जेव्हा साडी नेसते तेव्हा ती सुंदर दिसते. त्यामुळे आज नवरात्रीच्या पूजेदरम्यान काजलसारख्या स्लीव्हलेस ब्लाउजसह रीगल ब्लू हँडलूम बनारसी सिल्क साडी आणि हातात पोटली बॅगची ही शैली फॉलो करु शकता.
काजलचा बनारसी सिल्क साडी लूक (Instagram)
  • आदिती राव हैदरीचा निळा शरारा लूक: अभिनेत्री अदिती राव हैदरीप्रमाणे तुम्ही नवरात्रीला निळा शरारा घालू शकता. हे तुम्हाला रॉयल लूक प्रदान करेल.
आदिती राव हैदरीचा निळा शरारा लूक (Instagram)
  • अभिनेत्री माधुरी दीक्षितचा साडीचा लूक: जर तुम्ही नवरात्रीत आरामदायी पोशाख घालण्याचा विचार करत असाल तर, माधुरी दीक्षितचा हा साडीचा लुक तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. अशा साड्या नेसून तुम्ही नवरात्रीचा आनंद दीर्घकाळ अनुभवू शकता.
अभिनेत्री माधुरी दीक्षितचा साडी लूक (Instagram)
  • जान्हवी कपूरचा कॉटन सिल्क रॉयल ब्लू साडी लूक :जर तुम्हाला नवरात्रीमध्ये पारंपारिक लूक हवा असेल, तर तुम्ही अभिनेत्री जान्हवी कपूरच्या या कॉटन सिल्क रॉयल ब्लू साडी, झुमका आणि गजऱ्याचा ट्रेन्ड फॉलो करू शकता.
जान्हवी कपूरचा कॉटन सिल्क रॉयल ब्लू साडी लूक (Instagram)

ABOUT THE AUTHOR

...view details