हैदराबाद Benefits Of Moringa Leaves: बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक सायलेंट किलर आजार लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांना घेरत आहेत. आजारमुक्त जीवन जगण्याकरिता आपल्या आहारात काही बदल करणे गरजेचं आहे. परंतु कित्येकांना आपल्या परिसरात सहज उपलब्ध असलेल्या मोरिंगा म्हणजेच शेवग्याच्या पानांचे आरोग्याला होणारे असंख्य फायदे माहिती नाहीत. शेवग्याचं झाड हे जादू पेक्षा कमी नाही. भारतात शतकानुशतके आयुर्वेदात याचा वापर केला जात आहे. या झाडाचं प्रत्येक घटक आरोग्यासाठी उपयुक्त आहे. फळ, बिया आणि मुळ हे पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. परंतु पानं सर्वात आरोग्यदायी मानली जातात.
एनसीबीआयच्या अहवालानुसार मोरिंगाच्या पानांमध्ये जीवनसत्व ए, सी आणि ई खनिजे,(कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह) तसंच शरीरासाठी अत्यावश्यक असलेलं अमीनो ॲसिड मुबलक प्रमाणात आहे. त्याचबरोबर क्वेर्सेटिन, क्लोरोजेनिक ॲसिड, बीटा-कॅरोटीन यासारख्या अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणत आहेत. त्यामुळे मोरिंगाच्या सेवनाने आयुर्मान कमी करणारे 7 आजार आपण सहज टाळू शकतो.
रक्तदाब समस्या :मोरिंगाच्या पानांमध्ये असणारं अँटिऑक्सिडंट्स क्वेर्सेटिन रक्तदाब कमी करण्यास मदत करते. तसंच पोटॅशियम रक्तवाहिन्यांमधून रक्त परिसंचरण सुलभ करते.
मधुमेह ग्रस्तांसाठी फायदेशीर :मोरिंगा पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. तसंच यामध्ये असलेलं फायबर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करतो. परिणामी मधुमेहाचा धोका कमी होतो.
कोलेस्टेरॉल कमी : मोरिंगा पानांमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स पुरेशा प्रमाणात असतात. यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.