महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

चिकन आणि अंड्यांच्या सेवनानं खरचं अल्पवयात मुलींना मासिक पाळी येते काय? तज्ञ काय सागंतात

सध्या अल्पवयातच मुलींमध्ये हार्मोनल बदल होत आहेत. यामुळं मासिक पाळी देखील कमी वयात येवू लागली आहे. जाणून घ्या मासिक पाळी लवकर येण्याची कारणं

By ETV Bharat Health Team

Published : 4 hours ago

Girls early puberty
मासिक पाळी (ETV Bharat)

Girls early puberty:बदलत्या जीवनमानासोबतच सध्या अल्पवयातच मासिक पाळी येण्याची समस्या समोर आली आहे. पूर्वी मुलींना साधारणपणे १२ ते १४ वर्षांच्या दरम्यान मासिक पाळी येत होती. आता, ९ ते १० वर्षांच्या वयात मासिक पाळी येत आहे. काहींचा असा विश्वास आहे की, जास्त प्रमाणात चिकन, अंडी आणि पॅकेट दूध खाल्ल्यामुळं असं होतं. परंतु यामागिल सत्य काय? पोषणतज्ञ काय म्हणतात? लहान वयात मासिक पाळीची समस्या आणि इतर समस्या टाळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत? जाणून घेऊया.

पोषण तज्ञांच्या मते:मुलींना मासिक पाळी लवकर येण्यामागं काय कारणं असू शकतात. यावर सुप्रसिद्ध पोषण तज्ञ डॉ. जानकी श्रीनाथ सांगतात की, मुलींनी खाल्लेलं अन्न हे यामागील कारण असू शकतं. आजकाल बाजारात मिळणारं चिकन- मटन हार्मोनल इंजेक्शन दिलेल्या प्राण्यांचं असतं. जर दूधाबद्दल बोलायचं झालं तर, दूधाचं उत्पादन वाढवण्यासाठी गायींना देखील हार्मोनल इंजेक्शन दिले जातात. आपण सेवन करत असलेल्या चिकन, मटन आणि दुग्धजन्य पदार्थांद्वारे ते आपल्या शरीरात प्रवेश करतात. शरीरातील हार्मोन्समध्ये ते मिसळतात आणि हार्मोनल संतुलन बिघडतं. यामुळे मासिक पाळी लवकर येते. प्रत्येकाच्या बाबतीत असं घडेल असं खात्रीनं सांगता येणार नाही. परंतु, एक प्रकारचं अन्न जास्त प्रमाणात सेवन केल्यास ही समस्या होण्याची शक्यता जास्त असते. मुली लहान असताना त्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी विशेष पदार्थ खाणं आवश्यक आहे.

  • पोषणतज्ञ डॉ. जानकी श्रीनाथ म्हणाल्या, विशेषत: मुलींनी नियमित आहार घ्यावा. काही अभ्यासांच्या मते, ज्या मुली दूध, हिरव्या भाज्या, मांस आणि फायबरचं योग्य प्रमाणात सेवन करतात त्यांना तारुण्याआधी मासिक पाळीची समस्या येत नाही.
  • किशोरवयीन मुलींनी लठ्ठपणाला बळी पडू नये. त्यामुळे मांसाहार करताना अधिक काळजी घेतली पाहिजे. आपण चिकन खाण्यास प्राधान्य देत असल्यास, किशोरवयीन मुलींनी दररोज 75 ग्रॅमपेक्षा जास्त चिकन न खाणं चांगलं आहे. जर कोंबडी आणि उकडलेली अंडी असतील तर 50 ग्रॅम एवढं प्रमाण असावं. चिकन तळलेले किंवा ग्रील केलेले नाही याची खात्री करावी.
  • तरुण मुली 300 एमएल थंड दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घेऊ शकतात. जर तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही रागी पासून तयार फूड खावं. कारण रागीमध्ये कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असतात.
  • जर मांसाहार करत नसाल तर विविध कडधान्ये, सोयाबीन, मटर, बीन्स खावं, हिरव्या भाज्या खाण्यास विसरू नका. डॉ. जानकी श्रीनाथ सल्ला देतात की या आहार नियमांचं पालन करण्याव्यतिरिक्त, किशोर आणि तरुणींनी दररोज काही शारीरिक हालचाली किंवा व्यायाम केला पाहिजे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. दीर्घायुष्यासाठी वापरा जपानी फंडा; असे रहा सुदृढ
  2. तुम्ही सतत चिंताग्रस्त असता का? ट्राय करा 'या' टिप्स
  3. नियमीत खा 'हे' फळं; तणावापासून रहा मुक्त

ABOUT THE AUTHOR

...view details