मुंबई - April Fool Day 2024: प्रत्येकानं त्यांच्या लहानपणी एकदा तरी 'एप्रिल फुल बनाया' गाणं गायलं असेल. या गाण्याचा उल्लेख करत आहोत कारण आज 1 एप्रिल आहे. 1 एप्रिलला अनेकजण एप्रिल फूल डे साजरा करतात. या दिवशी अनेकजण आपल्या ओळखीच्या एखाद्याला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे प्रयत्न पूर्ण झाल्यावर ते आनंदानं त्याला 'एप्रिल फूल' म्हणतात आणि हा दिवस साजरा करतात. या वेगवान जीवनात, वर्षातील हा एक दिवस तुमचा तणाव दूर ठेवण्यासाठी साजरा केला जातो. वर्षभर लोक या दिवसाची वाट पाहत असतात. दरम्यान आज आपण एप्रिल महिन्यात उमलणाऱ्या फुलबद्दल समजून घेणारआहोत, ज्याचं नाव एप्रिल फुल. या फुलाला एप्रिल लिली असंही म्हणतात.
एप्रिल लिली विविध रंगामध्ये येते : हे फुल खूप आकर्षक असते. या फुलांना विविध रंग असतात. जंगलात आणि डोंगराळ प्रदेशातील गवताळ मैदानात हे फुल पाहायला मिळतं. एप्रिल महिन्यात ही फुले बहरतात. या महिन्यामध्ये तुम्ही ही फुले पाहू शकता. या फुलांचा बुकेमध्ये देखील वापर केला जातो. एप्रिलमध्ये उमलणारं हे फुल खूप खास आहे. लिली कोणत्याही बागेत सुगंध दरवळते. अनेकांना लिली फुलं आवडते. योग्यरित्या लागवड केल्यास कमीतकमी काळजी घेतल्यानंतर ही फुले 'एप्रिलमध्ये बहरतात. 'एप्रिल फूल' फुलदाणीमध्ये नेत्रसुखद दिसतात. लिली हे फुल लिलियम वंशातील आहेत.