KOTHIMBIR VADI RECIPE:कोथिंबीर वडी हा एक चवदार, कुरकुरीत आणि लोकप्रिय महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच लोक प्रचंड आवडीनं कोथिंबीर वडी खातात. हिवाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरात एकदा तरी कोथिंबीर वडी बनवली जाते. कारण इतर ऋतुंपेक्षा हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारात कोथिंबीर उपलब्ध असते. तसंच या दिवसांत कोथिंबीरचा दरही कमी असतो. यामुळे जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी लोक आवडीनं कोथिंबीर वड्या तयार करतात. तसंच बरेच लोक स्नॅक्स किंवा साइड डिश म्हणून सुद्धा कोथिंबीर वडी खातात. कोथिंबीर वडी बनवण्याची सर्वांची वेगवेगळी पद्धत असते. काहीजण वाफवून वडी तयार करतात तर कुणी बेसनाचा वापर न करता वडी तयार करतात. आज आम्ही तुमच्याकरिता कुरकुरीत कोथिंबीर वडीची रेसिपी घेऊन आलोय. ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा.
- साहित्य
- कोथिंबीर जुडी 1 नग
- चण्याचं पीठ 200 ग्रॅम
- तादंळाचं पीठ 100 ग्रॅम
- हिरवी मीरची 4 ते 5
- पांढरे तीळ 25 ग्रॅम
- लसूण 6 ते 7 पाकळ्या
- ओवा 1 टीस्पून
- जिरे 1 टीस्पून
- लाल तिखट 1 टीस्पून
- हळद 1/2 टीस्पून
- तेल
- चवीनुसार मीठ
- कृती
- सर्वप्रथम कोथिंबीर चांगली स्वच्छ धुवून घ्या त्यांनतर बारीक चिरून घ्या. आता एका चाळणीमध्ये कोथिंबर ठेवा.
- आता हिरव्या मिरच्या लसूण, जिरे, ओवा मिक्सरमधून बारी करून घ्या.
- आता एक परात घ्या. त्यात चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, तिखट, तीळ, तयार केलेली पेस्ट, हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट, चवणीनुसार मीठ आणि एक चमचा तेल घाला. संपूर्ण मिश्रण पाणी घालून एकजीव करा. लक्षात ठेवा पाणी जास्त घालू नका. मिश्रण घट्ट मळून घ्या.
- आता मिश्रणाचे रोल करून घ्या आणि वाफवायला ठेवा.
- 30 मिनिटं वाफवून घ्या आणि त्यांनतर सुरीच्या साहाय्यानं वड्या गोलाकार कापून घ्या.
- आता एका कढईत तेल गरम करा आणि कोथिंबीर वड्या कुरकुरीत तळून घ्या.
- तयार आहे तुमची कोथिंबीर वडी.
- तुम्ही वडी चपातीसोबत किंवा टोमॅटो सॉसबरोबरही खावू शकता.