Health Benefits of ABC Juice :निरोगी आरोग्यासाठी विविधप्रकारचे ज्यूस फायदेशीर आहेत. फळं आणि विविध भाज्यांचं ज्यूस आपण कधी ना कधी घेतलं असणारचं. परंतु, हेच एकत्र करून तयार केलेलं ज्यूस आपण प्यायले आहात काय? त्यापैकीच एक ज्यूस आहे तो म्हणजे एबीसी ज्यूस. ए म्हणजे अॅप्पल, बी म्हणजे बीटरूट आणि सी म्हणजे कॅरेट(गाजर). हा ज्यूस शरीर डिटॉक्सकरण्यासाठी उत्तम आहे. यामध्ये नायट्रेट्स, फायबर, व्हिटॅमिन ए, अँटिऑक्सिडंट्स तसंच बीटा कॅरोटीन, लोह, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, झिंक इत्यादी पोषक घटक पुरेशा प्रमाणात आढळतात. हा ज्यूस पोषक तत्वांचा पॉवर हाऊस आहे. तसचं हा ज्यूस मानसिक, शारीरिक तसंच केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
- एबीसी ज्यूसचे फायदे
- डिटॉक्ससाठी उत्तम:शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याकरिता एबीसी उत्तम आहे. यामुळे शरीर योग्यरित्या डिटॉक्स होत असून त्वचेवर वेगळीच नैसर्गिक चमक येते. हे एक बेस्ट डिटॉक्स ड्रिंक आहे.
- त्वरीत एनर्जी मिळते: एबीसी ज्यूसचं सेवन केल्यास शरीराला त्वरित एनर्जी मिळते. विविध प्रकारच्या व्हिटॅमिननं समृद्ध असलेल्या एबीसी ज्यूसमध्ये नॅचरल शुगर असते. यामुळे एनर्जी बूस्ट होते आण थकवा त्वरीत दूर होतो.
- दृष्टीसाठी चांगलं:डोळ्यांच्या आरोग्यासाठी एबीसी ज्यूस फायदेशीर आहे. यात असलेल्या बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. या ज्यूसमुळे डोळे कमजोर होत नाहीत.
- हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर:एबीसी ज्यूस ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी उत्तम आहे. तसंच शरीराताली कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी देखील एबीसी ज्यूस चांगलं आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयासंबंधित समस्या दूर होतात.
- केसांसाठी फायदेशीर: एबीसी ज्यूस प्यायल्यास केसांसंबधित समस्या दूर होतात. कारण यात पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स आणि लोहाचं चांगलं प्रमाण असते. यामुळे केस दाट, मजबूत आणि लांब होतात.
- चयाचय सुधारते: चयापयच सुधारण्यासाठी एबीसी ज्यूस मदत करते. कारण त्यात फायबर पुरेशा प्रमाणात असल्यामुळे पचनासंबंधीत तसंच गॅस आणि पोटाच्या समस्या दूर होतात.
- एबीसी ज्यूस बनवण्याची पद्धत
- आवश्यक साहित्य:
- सफरचंद - १
- बीटरूट - १
- गाजर - २
- लिंबाचा रस किंवा मध
- चवीनुसार काळं मीठ
कृती