महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

झटपट वजन कमी करण्यासाठी आजच फॉलो करा एक्सपर्ट टिप्स!

एका संशोधनानुसार, जगभरातील आठपैकी एक व्यक्ती लठ्ठ आहे. तुम्ही सुद्धा त्यापैकी असाल आणि तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर फॅालो करा एक्सपर्ट टिप्स.

How To Lose Weight Fast
वजन कमी करण्याच्या टिप्स (Etv Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Nov 12, 2024, 5:26 PM IST

Updated : Nov 12, 2024, 6:48 PM IST

How To Lose Weight Fast: जगभरातील आठपैकी एक व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त असल्याचं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. अभ्यासामध्ये असं दिसून आलं की, शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे टाइप-2 मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढतो. ऑस्ट्रेलियातील बाँड युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर हेली ओ नील आणि लोई अल्बर्ट काउनी यांनी संयुक्तपणे लठ्ठपणामुळे होणाऱ्या समस्या आणि लठ्ठपणा टाळण्याच्या मार्गांचा अभ्यास केला आहे.

  • संशोधन काय म्हणतं: दिवसेंदिवस लठ्ठपणा वाढत आहे. लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात बदल करावा लागेल. .याकरिता कमी कॅलरी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. लठ्ठ व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी अधूनमधून उपवास करावा. रात्रीला जेवण कमी करावं तसंच लवकर करावं. हे तिन्ही उपाय वजन कमी करण्यास मदत करू शकतात, असं संशोधनात आढळून आलं. संशोधकांनी 12 आठवड्यांत 2,500 लोकांवर हा अभ्यास केला. त्यानुसार, जवळजवळ प्रत्येकाने 1.4 - 1.8 किलो वजन कमी केले आहे.
  • लवकर खाणं चांगलं: जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही, तेव्हा मानवी शरीरात योग्य प्रकारे इन्सुलिन तयार होत नाही. यामुळे वजन वाढणे, थकवा येणे आणि मधुमेहासह अनेक जुनाट आजारांचा धोका वाढतो. मध्यरात्री नाश्ता केल्यानं अन्न नीट पचत नाही. तसंच रात्री जास्त अन्न खाल्ल्यास ते नीट पचत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. परंतु प्रत्येकजण रात्री लवकर खाऊन वजन कमी करू शकत नाही. काही उशीरा झोपतात. तर काहींना अजिबात झोप येत नाही. क्रोनोटाइप असलेल्या लोकांनी रात्री लवकर खाल्ल तरी वजन कमी होईल हे निश्चित सांगता येत नाही.
  • जेवण कमी करणे: सहसा बरेच लोक नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण करतात. इतर लोक 1-2 वेळा जेवण करतात. बाँड विद्यापीठाच्या संशोधनानुसार, दिवसातून तीन वेळा जेवण पुरेसं आहे. सहा वेळा जेवण्यापेक्षा तीन वेळा जेवण करणं चांगलं. शरीरासाठी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण पुरेसं आहे. स्नॅक्स टाळावं. तसंच नाश्ता आणि दुपारच्या जेवणानंतर रात्रीचं जेवण लवकरात लवकर घ्यावं.
  • उपवास: रात्री उशिरा जेवल्याने शरीराच्या अवयवांचे आरोग्य आणि कार्य बिघडते. यामुळे कालांतराने टाइप-2 मधुमेह आणि इतर जुनाट आजारांचा धोका वाढतो. रात्रपाळीत काम करणाऱ्यांना हे आजार होण्याची शक्यता जास्त असते. वेळेवर जेवण आणि अधूनमधून उपवास केल्यानं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणूनच तुम्ही तुमच्या शरीराला दिवसाच्या 6-10 तासांच्या आत आवश्यक असलेल्या कॅलरी पुरवल्या पाहिजेत. वेळेवर खाल्ल्यानं तुम्ही दिवसातून 200 पेक्षा कमी कॅलरीज खाऊ शकता.
  • हे महत्वाचे आहेत: नाश्ता आणि दुपारच्या जेवणासाठी उच्च कॅलरीयुक्त पदार्थ खा. रात्री जेवण जरा लवकर करा. तज्ञांनी असं सुचवलं आहे की अशा प्रकारे दिवसातून तीन वेळा खाणे चांगले आहे.
Last Updated : Nov 12, 2024, 6:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details