Elbow Darkness Removal Tips:कोपऱ्यांच्या काळेपणामुळे अनेकांना लाजिरवाणं वाटते. कोपराच्या काळपटपणाची वेगवेगळी कारणं अशू शकतात. जसं की, टॅनिंग हायपरपिंगमेंटेशन, गडद स्पाट तसंच कडक सूर्यप्रकाशात चालणे त्याचबरोबर एखाद्या अॅलर्जीमुळे तुमचे कोपर काळे पडू शकतात. मृत त्वचेच्या पेशी देखील यामागील एक कारण आहे. बहुतेकवेळा काळ्या आणि घाणेरड्या दिसणाऱ्या कोपरामुळे केवळ सौंदर्यच नाही तर आत्मविश्वास देखील कमी होतो. हा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. काळ्या कोपरामुळे होणारा पॅच टाळण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा, तुम्हाला नक्की परिणाम मिळेल.
- मध आणि लिंबू: सर्वांच्या घरात लिंबू सहज उपलब्ध असतो. लिंबू एक ल्बिचिंग एजंट म्हणून काम करतो. तसंच मध त्वचेला मोइश्चराईज करते. हे दोन्ही घटक एकत्र करून कोपरांवर लावणं चांगलं आहे. याकरिता सर्वात आधी तुम्ही एक लिंबू घ्या आणि त्याला कापून घ्या. आता त्यात मध घाला आणि एकजीव करून घ्या. हे मिश्रण तुमच्या कोपरांवर लावा आणि दहा मिनिटं तसंच राहू द्या. वाढल्यानंतर कोमट पाण्यानं कोपर धुवून घ्या. आठवड्यातून तीन किंवा चार वेळा असं केल्यास तुम्हाला चांगलं परिणाम मिळेल.
- दूध आणि बेकिंग सोडा:बेकिंग सोडा त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे, गाय आणि म्हशीचे दूध नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतात. एक चमचा बेकिंग सोडा घ्या त्यात दूध घाला आणि त्याची पेस्ट तयार करा. तयार झालेल्या पेस्ट तुमच्या कोपरांवर एका थरात लावा आणि ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. यानंतर थंड पाण्यानं कोपर स्वच्छ धुवा आणि मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही पद्धत वापरा. यामुळे तुमचे काळे झालेले कोपर स्वच्छ होतील.
- नारळाचं तेल आणि साखर:त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी नारळाचे तेल उत्तम आहे. त्याचप्रमाणे, साखर मृत पेशी काढून टाकण्यास देखील मदत करते. हे दोन्ही एकत्र लावल्याने डाग दूर होण्यास मदत होऊ शकते. एक चमचा नारळ तेलात चिमूटभर साखर मिसळून मिश्रण तयार करा. या मिश्रणानं तुमच्या कोपरांवर थोडा वेळ मसाज करा. मसाज केल्यानंतर कोमट पाण्यानं कोपर स्वच्छ धुवून घ्या.
- कोरफड जेल:कोरफड फार महत्वाची वनस्पती आहे. कोरफडीच्या जेलमध्ये अँटीऑक्सिडंट आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे त्वचा स्वच्छ आणि मऊ ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. कोपरांवर कोरफडीचे जेल लावा आणि २० मिनिटांनी थंड पाण्यानं धुवा. जर तुम्ही हे शक्य असेल तेव्हा केले तर काळे कोपर नाहीसे होतील.
- बटाटे:बटाट्यातील ब्लीचिंग गुणधर्म त्वचा पांढरी ठेवण्यास मदत करतात. बटाट्याचे तुकडे कोपरांवर आणि व्रण असलेल्या ठिकाणी १० मिनिटे घासा. यानंतर पाण्याने धुवून मॉइश्चरायझर लावल्यास डाग नाहीसे होतील. आठवड्यातून शक्य तितक्या वेळी असं केल्यास लवकर परिणाम दिसेल.
- महत्वाच्या टिप्स: कोरडी त्वचा टाळण्यासाठी कोपरांना दररोज मॉइश्चरायझर लावणे गरजेचं आहे. उन्हात बाहेर पडताना, टॅनिंग टाळण्यासाठी सनस्क्रीन लोशन लावा. तसंच तुमची त्वचा आतून निरोगी ठेवण्यासाठी वारंवार पाणी प्या.