काही दिवसांपासून तापमानामध्ये अचानक वाढ झाली आहे. ही उन्हाळ्याची सुरुवात असून त्रासदायक उष्णतेमुळे अनेक समस्या उद्भवू लागतात. विशेषतः त्वचे संबंधित समस्यांनी अनेक जण परेशान असतात. तसंच उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं खूप आव्हानात्मक असतं. उष्णता, धूळ आणि घाम हे सर्व तुमच्या त्वचेचे आरोग्य बिघाडू शकतात. म्हणूनच, जेव्हा उन्हाळ्याला सुरुवात होते. तेव्हापासूनच बऱ्याच लोकांना त्वचेच्या संरक्षणाची चिंता सतावते. परंतु, आता तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. उन्हाळ्यामध्ये तुमच्या त्वचेचे सौंदर्य गमावण्यापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता.
- सनस्क्रीन वापरा:बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन लावा. यामुळे सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होईल. SPF ३० किंवा त्याहून अधिक असलेले सनस्क्रीन नक्की निवडा. जास्त घाम येत असल्यास दर दोन तासांनी ते पुन्हा लावा. कान, मान आणि हातांना सनस्क्रीन लावणे अनिवार्य आहे.
- शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त ठेवा: उन्हाळ्यात डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून, शरीरात पुरेसे हायड्रेशन राखण्यासाठी विशेष काळजी घ्या. यामुळे त्वचेतील ओलावा कमी होण्यास प्रतिबंध होईल. भरपूर पाणी पिणे आणि मॉइश्चरायझर्स वापरणे त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करू शकते. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला नाईट क्रीम लावा. हायल्युरोनिक अॅसिड, पेप्टाइड्स आणि रेटिनॉल असलेली नाईट क्रीम निवडा.
- निरोगी आहार: तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन ए, सी आणि ई पदार्थ समाविष्ट करा. जे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. यामुळे सूर्यप्रकाशामुळे होणारे नुकसान भरून निघण्यास आणि त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास मदत होईल. तसंच तुमच्या आहारात ओमेगा- 3 फॅटी अॅसिड असलेले पदार्थ समाविष्ट करा.
- लिप बाम:तुमच्या ओठांची काळजी घेण्यासाठी एसपीएफ असलेले लिप बाम वापरा. हे सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास आणि ओठांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करेल.
- सैल आणि हलके कपडे घाला: उन्हाळ्यात सैल आणि हलक्या रंगाचे कपडे घालणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्या शरीराला घाम येण्यापासून रोखता येवू शकते. शिवाय गडद रंग जास्त उष्णता शोषून घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात गडद रंगाचे कपडे घालणं टाळा.
- दुपारचं सूर्यप्रकाश टाळा:उन्हाळ्यात दुपारी 12 ते 4 चार दरम्यान उन्हात जाणं टाळा. काही आवश्यक कामासाठी घराबाहेर जावं लागलच तर सनग्लासेस, कॅप, सनस्क्रीन, छत्री घेतल्याशिवाय बाहेर पडू नका.
- उन्हात पार्क केलेल्या गाडीत बसू नका: उन्हाळ्यात गाडी थेट उन्हात पार्क करणं टाळा. उन्हात गाडी पार्क केली असल्यास खिडक्या बंद करू नका. कारण उष्णतेमुळे तुमच्या गाडीचं तापमान वाढू शकते. परिणामी गाडीत बसलेल्या व्यक्तीला अस्वस्थता जाणवू शकते. काही प्रकरणात गाडीत बसलेली व्यक्ती उष्णतेमुळे बेशुद्ध देखील होण्याची शक्यता असते. उन्हात गाडी पार्क केली असता जाताना थेट एसी चालू करू नका. सर्वात आधी गाडीच्या खिडक्या खोला हवा खेळती होवू द्या आणि पाच मिनिटांनी एसी सुरु करा.
- ओआरएस जवळ ठेवा: उन्हाळ्यात बाहेर जाताना किंवा घरी ओआरएस किंवा रिहायड्रेशनचे काही पॅकेट जवळ ठेवा. बाहेर जाताना पिण्याच्या पाण्यात, बॉटेलमध्ये ओआरएस किंवा ग्लुकोज-डी मिळवून घ्या.