महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

जेवणानंतर बडीशेप खाणं कितपत सुरक्षित? - Health Benefits Of Fennel - HEALTH BENEFITS OF FENNEL

HEALTH BENEFITS OF SAUNF FENNEL : जेवणानंतर माऊथ फ्रेशनर म्हणून बडीशेप खाण्याची अनेकांची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर, ही माहिती तुमच्याचसाठी आहे. बडीशेप खाल्ल्यानं शरीरात काय होते? जाणून घेऊ.

HEALTH BENEFITS OF SAUNF FENNEL
जेवणानंतर बडीशेप खाणं कितपत सुरक्षित? (ETV Bharat CANVA)

By ETV Bharat Health Team

Published : Sep 16, 2024, 3:51 PM IST

हैदराबाद HEALTH BENEFITS OF SAUNF FENNEL : अनेकांना जेवणानंतर माउथ फ्रेशनर म्हणून बडीशेप म्हणजेच सौफ खाण्याची सवय असते. सामान्यतः कुणाच्या घरी चहा-कॅाफी घेतल्यानंतर बडीशेपचा डब्बा आपसुकच समोर केला जातो. मुखवास म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या बडीशेपचे आरोग्य विषयक अनेक फायदे आहेत. बडीशेपमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आर्यन, पोटॅशियम सारखे पोषक घटक असतात. यामुळे चयापचय सुधारते. हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. चला तर जाणून घेऊया बडीशेप खाण्याचे फायदे.

पचनाच्या समस्यांपासून दिलासा :आजकाल फास्ट फूड, तळलेले पदार्थ आणि इतर पदार्थ खाल्ल्यानं अनेकांना पचनाच्या विविध समस्यांना समोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत बडीशेप खाल्ल्यानं आराम मिळतो. बडीशेप चघळल्यानंतर त्यातून निघणारा पाचक रस आणि एन्झाईम पोट फुगणे, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी उपयुक्त आहे.

2017 मध्ये "एव्हिडन्स-बेस्ड कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन" जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जे लोक जेवणानंतर बडीशेप खातात त्यांच्यात पोटदुखी आणि अपचनाची लक्षणं कमी झाल्याचं आढळलं आहे. या संशोधनात लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजचे प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. एस. के. यांनी बडीशेपमध्ये असलेले पाचक रस अन्नाचं योग्य पचन करण्यास मदत करतात असा दावा केला आहे''.

चयापचय दर सुधारते:बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यात फेनेसोन, ऍनेथोल, एस्ट्राकोल सारखे नैसर्गिक तेल असतात. या सर्वांमुळे शरीरातील चयापचय गती वाढण्यास मदत मिळते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

श्वासाची दुर्गंधी कमी करते : तज्ज्ञांच्या मते, बडीशेप नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून काम करते. श्वासाची दुर्गंधी दूर करण्यात फायदेशीर आहे. बडीशेप तोंडीची पीएच पातळी सुधारते. जेवल्यानंतर लगेचच बडीशेप सेवन केल्यास तोंडातील बॅक्टेरिया दूर ठेवण्यास मदत होते.

बीपी नियंत्रण:बडीशेपमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक असतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहेत. तसंच त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यानं हाडांच्या आरोग्यासाठी मदत होते. तज्ज्ञांच्या मते बडीशेफमध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांचं आरोग्य सुधारते.

त्वचेच्या आरोग्यासाठी चांगलं: बडीशेप खाल्ल्यानं त्वचेचं आरोग्यही सुधारतं. विशेषत: यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात. परिणामी, हे लवकर वृद्धत्व टाळू शकतं असं म्हटलं जातं.

वजन कमी करण्यास मदत:बडीशेप रात्रभर पाण्यात भिवजवून सकाळी उकडून उपाशी पोटी पाणी प्यायल्यास वजन कमी होते.

बडीशेप अशा प्रकारे घ्या: जेवणानंतर थोडी बडीशेप खा. किंवा बडीशेप पाण्यात उकळून, गाळून त्यात थोडं मध टाकून प्या. आपल्या मसाल्यांमध्ये मिसळून डिशमध्ये देखील वापरलं जाऊ शकतं. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, परिणामी, व्यंजन केवळ चवदारच नाहीत तर आरोग्यासाठी देखील चांगले आहेत.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. उपाशी पोटी धण्यांचे पाणी पिण्याचे अद्भुत फायदे; मधुमेहासह वजनही नियंत्रणात - Benefits of soaked coriander water
  2. स्वयंपाक घरातील दालचिनी मधुमेहावर रामबाण; 'या' पद्धतीनं उपयोग केल्यास उत्तम परिणाम - Cinnamon Control Sugar Level

ABOUT THE AUTHOR

...view details