हैदराबाद How Does It Improve Bone Health : वाढत्या वयात आपल्याला अनेक शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागते. त्यात सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे हाडं कमजोर होण्याची. दरम्यान हाडं इतके ठिसूळ होतात, की त्यामुळे ती तुटण्याची देखील भिती असते. या परिस्थितीला ऑस्टियोपोरोसिस म्हणतात. पुरुष किंवा महिला दोघांना ही ऑस्टियोपोरोसिस होऊ शकतो. या आजाराला सायलेंट किलर म्हणून देखील ओळखलं जाते. कारण हा आजार चोर पावलांनी आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि गंभीर स्वरुप धारण केल्यानंतर त्यावर उपचार करणं देखील कठीण होतं.
वाढत्या वयानुसार ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. परंतु सध्याच्या अयोग्य जीवनशैलीमुळे लहान वयातच ऑस्टिओपोरोसिसची समस्या भेडसावू लागली आहे. व्यक्ती दर 10 वर्षांनी 3 ते 8 टक्के स्थायू गमावतात. यामुळे हाडं कमकुवत तसंच ठिसूळ होवू लागतात. यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी करायचा असेल, तर नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया वयानुसार किती व्यायाम कराण्याची गरज आहे.
नियमित एक्सरसाइज करणं लहानांपासून ते वृद्धापर्यंत उपयुक्त आहे. यामुळे आपल्याला आरोग्यविषयक अनेक फायदे होतात.
- व्यायामामुळे मुलांची हाडं मजबूत होतात, तरुणांचे स्नायू बळकट होतात.
- तरुण वयात हाडांची होणारी झीज रोखण्यास मदत होते.
- हाडांचं संतुलन राखण्यास उपयुक्त
- ऑस्टियोपोरोसिस टाळण्यास मदत होते.
ऑस्टियोपोरोसिस म्हणजे काय?:ऑस्टियोपोरोसिस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये हाडांची घनता कमी होते परिणामी हाडं कमकुवत होतात. हाडांची ताकद कमी झाल्यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. ऑस्टिओपोरोसिस हा हाडांशी संबंधित आजार आहे. सहसा त्याची लक्षणं दिसून येत नाहीत. हाडांच्या फ्रॅक्चरनंतर ही लक्षणं दिसतात.
हाडांच्या आरोग्यासाठी कोणते व्यायाम चांगले आहेत? :जर तुमच्या हाडांची घनता कमी झाली असेल, तसंच तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस किंवा इतर शारीरिक समस्या असतील, तर व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्यासाठी कोणत्या प्रकारच्या शारीरिक हालचाली सुरक्षित आहेत आणि तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहेत, हे निवडण्यात डॉक्टर तुम्हाला मदत करू शकतात.
हाडांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम व्यायाम
वेगानं चालणं (3 ते 4 किमी प्रति तास)
जॉगिंग किंवा धावणं
टेनिस, बॅडमिंटन, पिंग पॉंग, पिकलबॉल आणि इतर खेळ
पायऱ्या चढणं
नृत्य करणं
लाईट एक्सरसाइज : विशेषतः वृद्ध लोकांसाठी महत्वाचा आहे.
- अस्थिर पृष्ठभागावर चालणं (उदा. फोम चटई किंवा वॉबल बोर्ड)
- ताई ची (ताई ची एक प्राचीन चीनी मार्शल आर्टचा प्रकार आहे)
- मागं चालण्याचा व्यायाम
- स्टेप-अप व्यायाम
- फुफ्फुसाचा व्यायाम
- दोन्ही पाय एकत्र ठेवून किंवा एका पायावर उभं राहून आपल्या शरीराचं वजन मागं-पुढं हलवा
हाडे निरोगी ठेवण्यासाठी आपण किती व्यायाम केला पाहिजे? :