महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

काळ्या पदार्थांचे आश्चर्यकारक फायदे; सांधेदुखी ते मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर - HEALTH BENEFITS OF BLACK FOODS

काळ्या पदार्थांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आणि इतर पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, असं तणांचं म्हणणं आहे. चला तर जाणून घेऊया काळ्या पदार्थांचे इतर आरोग्यदायी फायदे.

Health Benefits of Black Foods
काळे तीळ आणि काळे द्राक्ष (ETV Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Oct 15, 2024, 5:28 PM IST

Health Benefits of Black Foods:आहारामध्ये भाज्या, फळं आणि धान्य किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला माहिती आहे. परंतु, यासोबतच असे काही अन्न पदार्थ आहेत ज्यांचा रंग काळा असून ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. काळ्या रंगाच्या पदार्थामध्ये अँथोसायनिन्स नावाचं रंगद्रव्य असतं. तसंच निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या पदार्थांमध्ये ही रंगद्रव्ये अधिक असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. तसंच शरीराला कोणत्याही आजाराशी प्रभावीपणे लढण्याची शक्ती प्रदान करतात. विशेष म्हणजे, थोसायनिन्स हृदयासंबंधित आजार, कर्करोग आणि मधुमेह या सारख्या भयावह आजारांशी लढण्यासाठी फायदेशीर आहे.

  • काळे तांदूळ: हे तांदूळ आपण रोज खातो त्या तांदळापेक्षा रंगानं काळपट असतो. या धान्यामध्ये असलेलं ल्युटीन आणि झियांथिन डोळ्यांचं आरोग्य सुधारतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असं म्हटलं जाते की, यात मुबलक प्रमाणात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीराला कर्करोगाशी लढण्याची शक्ती देतात. या तांदूळापासून तुम्ही भातासोबत बिर्याणी, पुलाव, पुट्टू, डोसा, इडली, खीर असे पदार्थही बनवू शकता.
काळा तांदूळ (ETV Bharat)
  • काळी मसूर: काळी मसूर डाळ चवीसोबतच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात लोह, फायबर, प्रोटीन, फोलेट आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटकही असतात, असं तज्ञांचं म्हणणं आहे. या डाळीचं सेवन नियमित केल्यास शरीरातील चरबीचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येते. तसंच यामध्ये असलेले पोटॅशियम रक्ताभिसरण सुधारण्यासाठी उपयुक्त असल्याचं तज्ञ सांगतात.
  • काळे तीळ:काळ्या तिळाचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचं तज्ञ सांगतात. ज्यांना वजन वाढवायचं आहे, त्यांनी काळे तीळ खाल्ल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. काळ्या तिळामध्ये फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन ई यांसारखे पोषक तत्व असतात. सांधेदुखीसह जळजळ कमी करण्यासाठी काळे तीळ उत्तम असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
काळे तीळ (ETV Bharat)
  • काळी द्राक्षे: बद्धकोष्ठता, उच्चरक्तदाब आणि केस पांढरे होणे यासारख्या समस्यांवर काळी द्राक्षे अत्यंत उपयुक्त असल्याचं तज्ञ सांगतात. तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, हाडांचे आरोग्य सुधारण्यासोबतच कॅन्सरशी लढण्यासाठी काळी द्राक्षं खूप उपयुक्त आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि लिव्होलिक ॲसिड भरपूर आहेत.
दाक्ष (ETV Bharat)
  • काळं लसूण:पांढरं लसूण आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु, काळं लसूण देखील उपलब्ध आहे. ते नूडल्स, सूप इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. तज्ञांचं म्हणणं आहे की, त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि इतर गुणधर्म हे अँटी-कार्सिनोजेनिक घटक म्हणून काम करतात.
काळा लसूण (ETV Bharat)
  • इतर अन्न पदार्थ :काळं मशरूम, यकृत-पोटाच्या आरोग्यासाठी, मेंदूची कार्यक्षमता आणि प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी हे चांगलं आहे. तसंच, वैद्यकीय तणांचं म्हणणं आहे की, काळ्या मिरीमध्ये चरबी आणि साखरेचं प्रमाण नियंत्रित करणारे गुणधर्म असतात. ते शरीराला कर्करोगाशी लढण्याची शक्ती प्रदान करतं. ब्लॅकबेरीमध्ये व्हिटॅमिन सी सोबतच व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असतं. ब्लॅकबेरी तोंडाचं आरोग्य आणि मेंदूच्या क्रियाकलापांमध्ये खूप फायदेशीर आहे

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. तुम्ही सतत चिंताग्रस्त असता का? ट्राय करा 'या' टिप्स
  2. चिकन आणि अंड्यांच्या सेवनानं खरचं अल्पवयात मुलींना मासिक पाळी येते काय? तज्ञ काय सागंतात
  3. दीर्घायुष्यासाठी वापरा जपानी फंडा; असे रहा सुदृढ

ABOUT THE AUTHOR

...view details