Happy Rose Day 2025: जगभरातल्या प्रेमी युगुलांसाठी फ्रेब्रुवारी महिना हा खास असतो. कारण या महिन्यात व्हॅलेंटाईन डे जगभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे. व्हॅलेंटाईन विकचा पहिला दिवस म्हणजे रोज डे. जगभरामध्ये 7 फेब्रुवारी रोजी रोज डे साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगूल गुलाबाची फुले देऊन त्यांचं नात दृढ करतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब चागंला पर्याय आहे. कारण गुलाबाचं फुल प्रेम आणि रोमान्सचे प्रतीक आहे. परंतु तुम्ही गुलाबासोबतच काहीतरी वेगळे देऊन तुमच्या जोडीदारापर्यंत आपल्या भावना पोहचवू शकता. कारण गुलाबाच्या फुलांसह भेटवस्तू देण्याचा ट्रेंड आजकाल वाढला आहे.
- का साजरा केला जातो रोज डे?
वर्षभर मनामध्ये साठवून ठेवलेलं प्रेम रोज डेच्या निमित्तानं गुलाबाचे फूल देऊन व्यक्त करता येते. गुलाब प्राचीन काळापासून प्रेमाचे प्रतीक मानले जाते. मुघल बादशाह जहांगीर यांची राणी मुमताज यांना गुलाब फार आवडायचे म्हणून शाहजहां त्यांना भेटवस्तू म्हणून गुलाब पाठवत असत. तर महाराणी व्हिक्टोरियाच्या काळात प्रेम व्यक्त करण्यासाठी लोकांनी एकमेकांना लाल गुलाब देण्याची परंपरा सुरु केली. त्यामुळे गुलाबाला प्रमेचं प्रतीक मानलं जाऊ लागलं.
- गुलाबाच्या रंगाचे अर्थ
- लाल गुलाबः लाल रंगाचे गुलाब निर्विवाद प्रेमाचे प्रतीक आहे.
- पिवळा गुलाबः पिवळा गुलाग मैत्रीचे प्रतीक मानले जाते.
- पांढरा गुलाब: पवित्रता, शुद्धता आणि निरागसतेचे प्रतीक आहे.
- गुलाबी: अधिक प्रिय व्यक्तीला गुलाबी रंगाचे फूल देतात.
- केशरी: केशरी गुलाब आवड आणि उर्जेचे प्रतीक मानले जाते.
- या भेटवस्तू द्या
- कृत्रिम गुलाब: गुलाब दिनी गुलाब देणे निःसंशयपणे रोमँटिक आहे. परंतु खरे गुलाब लवकर सुकतात आणि खराब होतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला कृत्रिम गुलाब देऊ शकता. हे कृत्रिम गुलाब बाजारात १५० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
- रोज डे कुशन: जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला काहीतरी वेगळं द्यायचं असेल तर कुशन हा एक उत्तम पर्याय असेल. गुलाबी रंगाचे भरतकाम केलेले कुशन आजकाल खूपच ट्रेंडी आहेत. हे बाजारात सहज उपलब्ध आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फोटो कुशन देखील तयार करू शकता. ते करण्यासाठी, तुम्हाला ३ ते ४ दिवस आधी ऑर्डर द्यावी लागेल.
- रेझिन चेन:गुलाबांची काळजी घेणे हे खूप कठीण काम आहे. लोक अनेकदा गुलाबाचे फूल जतन करण्यासाठी ते पुस्तकात किंवा डायरीत ठेवतात. जर तुमच्याकडेही असा जुना गुलाब असेल तर तुम्ही या गुलाब दिनी तुमच्या जोडीदाराला रेझिन चेन भेट देऊ शकता. ते गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवले जाते. आजकाल बाजारात ते सहज बनवता येते.
- हाताने तयार केलेल्या भेटवस्तू: बाजारातून भेटवस्तू खरेदी करण्याऐवजी, तुम्ही हाताने काहीतरी बनवू शकता आणि भेट म्हणून देऊ शकता. हे पाहून तुमचा जोडीदाराला अधिक आनंद होईल. हाताने बनवलेली भेटवस्तू तुमचे प्रेम दर्शवते. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी पेंटिंग, विणलेला स्कार्फ किंवा हाताने बनवलेले ग्रीटिंग कार्ड तयार करून देवू शकता.