महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

दिवाळीत प्रियजनांना द्या खास उपहार; हे आहेत बजेट फ्रेंडली गिफ्ट

Diwali Gifts For Family And Friends: दिवाळीकरिता प्रियजनांना भेटवस्तू देण्याचा विचार करत आहात? खालीली दिलेल्या बजेट फ्रेन्डली वस्तू भेट करून आनंद द्विगुणीत करा.

Diwali Gifts For Family And Friends
दिवाळीला प्रियजनांना द्या या गोष्टी भेट (Getty Images)

By ETV Bharat Lifestyle Team

Published : 4 hours ago

Diwali Gifts For Family And Friends: दिवाळी जसजशी जवळ येत आहे, तसतशी मित्र आणि कुटुंबीयांना उसंत काढून भेटण्याची आतुरता वाढत आहे. अशात विविध पदार्थ तयार करणं, साफसफाई करणं आणि घराची सजावट या कामासोबतच तुमच्या प्रियजनांसाठी भेटवस्तू निवडण्यासाठी तुमच्याकडे थोडाच वेळ शिल्लक आहे. परंतु काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम भेटवस्तूंची यादी घेऊन आलोय. जे तुमच्या बजेटमध्ये तर आहेच. सोबतच तुमच्या प्रियजनांनादेखील ते फार आवडेल.

  • चांदीचं नाणं: चांदीची नाणी आणि भांडी ही दिवाळीसाठी बजेट-अनुकूल भेटवस्तू आहे. दिवाळीच्या काळात चांदीची खरेदी करणं शुभ मानलं जाते. 1 ग्रॅमपासून 50 ग्रॅमपर्यंतची चांदीची नाणी बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही ₹1,000 च्या खाली काही पर्याय शोधत असल्यास, 5- किंवा 10-ग्राम चांदीचं नाणं मित्र किंवा नातेवाईकांसाठी एक आदर्श भेट ठरू शकते.
चांदीचं नाणं (Getty Images)
  • डिनरवेअर क्रॉकरी:दिवाळी म्हणजे स्वादिष्ट अन्न आणि मिठाई यांच्याशी संबंध. एक उत्तम भेटवस्तूचा पर्याय म्हणजे क्रॉकरी. जी तुमच्या नातेवाईकांच्या सणाच्या मिष्टान्न दिनचर्येला पूरक ठरेल. त्यांच्या क्रॅाकरीमध्ये भर टाकण्यासाठी फुलांचा किंवा बॉर्डर पॅटर्नसह किमान, मोहक डिझाईन्स निवडा. क्रॉकरी सेट सुमारे ₹1,000 पासून सुरू होतात. जे स्टायलिश आणि उत्कृष्ट पर्याय आहे.
डिनरवेअर क्रॉकरी (Getty Images)
  • गिफ्ट कार्ड:काय खरेदी करावं याबद्दल अद्याप अनिश्चित आहात? Amazon, Flipkart, किंवा Myntra वरून गिफ्ट कार्ड घ्या. हे प्लॅटफॉर्म तुमच्या बजेटनुसार वेगवेगळ्या किंमतींवर गिफ्ट कार्डांची विस्तृत श्रेणी देतात. ऑनलाइन खरेदी, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कपड्यांसाठी असो, भेट कार्ड तुमच्या नातेवाइकांना नक्की आवडेल. फक्त अधिकृत वेबसाइटला वेबसाइटवरूनच गिफ्ट कार्ड खरेदी करा आणि तुमच्या मित्राचे किंवा कुटुंबातील सदस्यांना भेट द्या.
गिफ्ट कार्ड (Getty Images)
  • पितळी लक्ष्मी गणेश मूर्ती: दिवाळीच्या पूजेच्या वेळी लोक लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती खरेदी करतात. तुमच्या प्रियजनांना पितळेच्या लक्ष्मी-गणेशाच्या मूर्ती, बुद्ध मुर्ती किंवा इतर देवतांच्या मूर्ती भेट देवू शकता. ज्या शांती आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून दिल्या जातात. ही वैचारिक भेट दिवाळीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाशी सुसंगत आहे.
पितळी लक्ष्मी गणेश मूर्ती (Getty Images)
  • ड्राय फूट किंवा मिठाई: मिठाईशिवाय दिवाळी अपूर्ण! दिव्यांचा सण असण्यासोबतच दिवाळी हा गोड पदार्थांचाही उत्सव आहे. तुम्ही स्वीट बॉक्स किंवा ड्रायफ्रूट बॉक्स आपल्या प्रियजणांना देवू शकता. सुका मेवा हा एक चांगला पर्याय आहे. कारण तो आपण कधीही खावू शकतो परंतु मिठाई काही दिवसांनी खराब होऊ शकते.
ड्राय फूट किंवा मिठाई (Getty Images)
  • स्किन केअर किट: निरोगी त्वचा राखण्यासाठी त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: दिवाळीच्या वेळी जेव्हा फटाक्यांमुळे धूर होतो. अशा वेळी स्किनकेअर किट एक उत्तम भेट आहे. हे फक्त महिलांसाठी नाही-पुरुष देखील स्किनकेअर वारतात.
स्किन केअर किट (Getty Images)
  • समृद्ध वनस्पती: फुलझाडं आणि इतर प्रकारचे झाडे प्रियजनांना देवू शकता. विशेषत: ज्यांना बागकाम आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये वेळ घालवणं आवडते, त्यांच्याकरिता ही एक उत्कृष्ट भेटवस्तू आहे. तुम्ही तुळस, मनी प्लांट, गोल्डन बांबू, स्नेक प्लांट, ऑर्किड, अरेका पाम, स्पायडर प्लांट यासारखे प्लांट भेट म्हणून देवू शकता. यामुळे घरामध्ये सुख-शांति आणि समृद्धी नांदते. तुमचा मूड देखील सुधारतो. शिवाय तुमच्या घरातील सौंदर्य आणि भौतिक वातावरण चांगलं राहते. उल्लेखनीय म्हणजे तुमचं मानसिक आरोग्यदेखील सुधारते. तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते.
समृद्ध वनस्पती (Getty Images)

ABOUT THE AUTHOR

...view details