हैदराबादBest Foods For diabetes - धावपळीचे जीवन, चुकीची जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे मधुमेही रुग्णांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहाराची आवश्यकता आहे. एकदा मधुमेह झाला की आयुष्यभर हा रोग रुग्णाची पाठ सोडत नाही. साखर वाढण्याच्या भीतीनं रुग्ण आहार कमी घेतो. कोणता आहारा घ्यावा, याबाबत अनेकांमध्ये संभ्रमावस्था असते. मधुमेही लोकांनी कोणता आहार घ्यावा? कोणती काळजी घ्यावी? याबाबत माहिती घेऊया.
मधुमेहाची काय आहेत लक्षणे -अनेकांना बालपणापासून मधुमेह असतो. जर वेळीच त्याकडं लक्ष दिलं नाही तर दुसऱ्या रोगाची लागण होण्याची भीती असते. आहाराच्या चुकीच्या सवयी आणि ताण हे मधुमेहाचं खरं कारण असल्याचं डॉक्टर सांगतात. सारखं लघवीला जावं लागत असेल, खूप तहान लागणे, खूप भूक लागणे आणि पायाला सूज ही मधुमेहाची लक्षणं आहेत. मधुमेही रुग्णांनी तीन महिन्यांतून एकदा HPA1c टेस्ट करणं आवश्यक असतं. त्यामध्ये रिपोर्ट ३ ते ५.४ पातळीपर्यंत आल्यानंतर घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र, जर ५.६ पातळी असले तर प्रीडायबटिक श्रेणीत तुम्ही आहात. जर रिपोर्टमधील पातळी ही ७ हून अधिक असेल तर तुम्हाला मधुमेह झाला आहे, असं मानण्यात येतं.
आहारात याचा करा समावेश -मधुमेह झाला असेल तर आहार काळजीपूर्वक घ्यायला हवा. संतुलित आहारामुळे मधुमेहावर नियंत्रण राहाते. रुग्णाला कोणत्याही स्थितीत शरीरातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे लागते. आहारात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करावा. प्रथिनयुक्त आहाराच्या तुलनेत कार्बोहायड्रेट्स आहारातून साखरेचे शरीरामधील प्रमाण वाढते.