महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

'या' तीन कारणांमुळे कर्करोगाची होते सुरुवात; काय म्हणाले आरोग्य तज्ज्ञ ? - CANCER reasons

Health Expert on Cancer : लठ्ठपणा, खराब आहार आणि शारीरिक निष्क्रियता यांमुळं पित्ताशय, कोलन, किडनी आणि स्वादुपिंड यासह अनेक कर्करोगांची सुरुवात होते, असं ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील आरोग्य तज्ज्ञानं सांगितलंय.

Health Expert on Cancer
लठ्ठपणा, खराब आहार आणि शारीरिक निष्क्रियता यामुळं कर्करोगाची सुरुवात होते (Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 10:46 AM IST

नवी दिल्ली Health Expert on Cancer : गेल्या तीन दशकांमध्ये कर्करोगाच्या सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. लोक 40 किंवा 50 वर्षांचे होण्यापूर्वीच त्यांना कर्करोग होतो. भारतासह जगभरातील कर्करोगाच्या वाढीचं प्रमाण चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढलं आहे. यात साखर, मीठ आणि चरबीयुक्त जंक फूडचा जास्त वापर आणि व्यायामाचा अभाव यासह इतर कारणांचा समावेश आहे.

काय म्हणाेल तज्ज्ञ : जागतिक पातळीवर तरुणांमध्ये काही प्रकारच्या कर्करोगात लक्षणीय वाढ झालीय. उदाहरणार्थ, 1991 ते 2021 या कालावधीत 30 ते 39 वयोगटातील लोकांच्या पित्ताशयाच्या कर्करोगाचं प्रमाण 200 टक्क्यांनं वाढल्याचं सिडनी विद्यापीठातील मेडिसिन अँड हेल्थ विभागाच्या कुलगुरू रॉबिन वॉर्डनं म्हटलंय. रॉबिननं नमूद केलं की "एकूणच, स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. पुरुषांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे". कर्करोगाचे प्रमाण अवयवांच्या प्रकारानुसार बदलतात. उदाहरणार्थ, फुफ्फुस आणि कोलोरेक्टल कर्करोग हे पुरुषांमध्ये सर्वात जास्त आढळतात. तर स्तन, फुफ्फुस आणि कोलोरेक्टल कर्करोग स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं आढळतात, असं रॉबिन यांनी सांगितलं.

सामान्यतः उद्भवणारे कर्करोग कोणते आहेत? ते कसे रोखायचे? : गर्भाशय ग्रीवा आणि कोलोरेक्टल सारख्या बहुतेक कर्करोगांमध्ये, लवकर निदान झाल्यामुळं बरा होण्याची शक्यता वाढते. परंतु मेंदूच्या कर्करोगासारख्या काही लोकांसाठी, लवकर शोधून काही फरक पडत नाही. रॉबिन म्हणाल्या की, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग आणि कोलोरेक्टल (आतड्यांचा) कर्करोग हा प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम पुरावा आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग लसीकरणाद्वारे टाळता येऊ शकतो. लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार करता येते. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) च्या विशिष्ट प्रकारांचा संसर्ग हा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचं कारण ठरतो.

काय करता येईल उपाय : दुसरीकडे, स्तन, गर्भाशय ग्रीवा आणि कोलोरेक्टल (कोलन) कर्करोगासाठी वाढत्या राष्ट्रीय स्क्रीनिंग कार्यक्रमांमुळं उपचारांना चालना मिळू शकते. तसंच मृत्यूदर कमी होण्यास मदत होऊ शकते. काही तरुणांना कॅर्करोगाचा धोका जास्त असतो तर वृद्धांना नसतो. त्यामुळं वय-आधारित स्क्रीनिंग प्रोग्राम कदाचित मदत करणार नाहीत. परंतु, आधुनिक तंत्रज्ञान जसं की जीनोमिक्स, मोठा डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

हेही वाचा :

  1. कोरोना लसीमुळे दुष्परिणाम म्हणून 'हा' गंभीर विकार होतो, वैद्यकीय तज्ज्ञांची धक्कादायक माहिती - COVID vaccine side effects
  2. कोविशील्ड साइड इफेक्ट्स: नागरिकांना लस नुकसान भरपाईसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल - Covishield Side Effects Plea

ABOUT THE AUTHOR

...view details