महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

मधुमेही रूग्ण खजूर खावू शकतात काय? जाणून द्या तज्ज्ञ काय सांगतात - Can Diabetic Patient Eat Dates

Can Diabetic Patient Eat Dates : खजूरमध्ये भरपूर पोषक घटक आहेत. जसं की अ‍ॅंटीऑक्सिडंट्स, फिनोलिक संयुगे, फायटोस्टेरॉल, फ्लेव्होनॉइड्स, फायबर, कार्बोहायड्रेट्स. यामुळे बहुतांश व्यक्ती त्याचा सेवन करतात. परंतु मधुमेही रुग्ण खजूर खावू शकतात काय? हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊया.

Can Diabetic Patient Eat Dates
खजूर खाण्याचे फायदे (ETV Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Aug 30, 2024, 5:11 PM IST

हैदराबाद Can Diabetic Patient Eat Datess :खजूर फळाला सुपर फूड म्हणून ओळखलं जात. हे केवळ चवदारच नाही तर आरोग्यदायी देखील आहे. खजूरामधील पोषक घटकांमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. म्हणूनच बरेच लोक ते स्नॅक्स म्हणून खातात. बहुतांश लोकांना खजूर खायला आवडते. परंतु मधुमेही रुग्ण आपल्या आहारावर विशेष लक्ष देतात. गोड खाणं तर त्यांच्यासाठी फार धोकादायक आहे. अनेक पदार्थाबद्दल त्यांना पथ्य पाळावं लागतात. परंतु मधुमेह असलेल्या लोकांना खजूर खाण्यापासून देखील वंचित राहावं लागतं. कारण खजूरमध्ये नैसर्गिकरित्या साखर असते. ही साखर रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवते असं मानलं जातं. खजूरमध्ये आयरन अ‍ॅंटीऑक्सिडंट्स, कॅलरीज पुरेशा प्रमाणात असतात. मधुमेही रुग्ण खजूर खाताना घाबरतात. मधुमेहींना खजूर खाता येईल की नाही? चला जाणून घेऊया.

मधुमेही खजूर खाऊ शकतात का?खजूर नैसर्गिकरित्या गोड असतात. बहुतांश लोक ते साखरेऐवजी घेतात. इतर पदार्थांच्या तुलनेत खजूरमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. तसंच फायबरचे प्रमाण देखील अधिक असते. हे रक्तातील ग्लुकोजचं शोषण कमी करतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाहीत, असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन रिपोर्टनुसार मधुमेही रुग्णांनी खजूर जास्त प्रमाणात सेवन करु नये. कमी प्रमाणात सेवन करणं फायदेशीर.

रक्तातील साखर आणि HbA1c पातळी कमी :जर्नल ऑफ आयुर्वेद अँडइंटिग्रेटिव्ह मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या 2018 च्या अभ्यासात असं आढळून आलं की, 12 आठवडे खजूर खाल्ल्याने टाइप-2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखर आणि HbA1c पातळी कमी होते. बांग्लादेशातील ढाका येथील बंगबंधू शेख मुजीब मेडिकल युनिव्हर्सिटीमधील बायोकेमिस्ट्री विभागातील प्राध्यापक डॉ. मोहम्मद एम. अल-मामुन या संशोधनात भाग घेतला.

  • खजूर खाण्याचे फायदे
  • जलद ऊर्जा : खजूरमधील ग्लुकोज, फ्रक्टोज आणि सुक्रोज कार्बोहायड्रेट असतात. तज्ज्ञांच्या मते थकल्यासारख वाटल्यास खजूर खावं. तसंच व्यायम केल्यानंतर खजूर खाल्लं तर लवकर ऊर्जा वाढते.
  • हाडांच्या आरोग्यासाठी चांगले :खजूरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे यासह विविध खनिजे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी तांबे, मॅग्नेशियम हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
  • वजन कमी :खजूरमध्ये कोलेस्ट्रॉल आणि कॅलरीज कमी असतात. प्रथिनांचे प्रमाण जास्त असतात. त्यामुळे हे खाल्ल्यास तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटेल. परंतु, डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हे केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही, तर वजन वाढवण्यासाठी देखील खजूर महत्त्वाचं आहे.
  • बद्धकोष्ठता: खजूरमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. यामुळे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी यासारख्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळते, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बद्धकोष्ठता असलेल्यांनी खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावीत आणि सकाळी उपाशीपोटी सेवन करावं. यामुळे त्यांना आराम मिळेल.
  • हृदयासाठी चांगले : खजूर हृदयासाठी फायदेशीर आहे. खजूर खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल पातळी कमी होते. यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होत. शिवाय हिवाळ्यामध्ये हृदय हेल्दी ठेवण्यासाठी खजूराचं सेवन करणे चांगल मानलं जातं.
  • किडनी स्टोन विरघळते: तज्ज्ञांनी किडनी स्टोन विरघळण्यासाठी नियमितपणे खजूर खाण्याचा सल्ला दिला आहे. तसंच, काही लोकांना लघवी येणे, मूत्रमार्गात संसर्ग इत्यादी समस्या असतात. खजूर खाल्ल्याने या सर्व समस्या कमी होतात असं डॉक्टरांचं म्हणणे आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )

हेही वाचा

  1. बैठे काम करणाऱ्यांनी 'हा' डायट प्लॅन फॉलो करा; आरोग्याची समस्या टळेल - ICMR Diet Plan
  2. मीठ खाण्याचे दुष्परिणाम; दिवसभरात किती मीठ खावं! वाचा - Side Effect Of Consuming Salt

ABOUT THE AUTHOR

...view details