हैदराबाद Benefits Of Drinking Water : एक चांगली सवय आपलं आयुष्य बदलू शकतं. त्यामुळं शरीराला उत्तम सवयी लावल्यास तुम्ही सहाजीकच निरोगी राहू शकता. अशीच एक सवय आपण आपल्या रूटीनमध्ये आत्मसात केल्यास आपणास जबरदस्त फायदे होवू शकतात. ती म्हणजे सकाळी उपाशीपोटी पाणी पिणे होय. बहुतांश लोक सकाळी उपाशीपोटी पाणी पित नाहीत. मानवी शरीराचा 60 टक्के भाग पाण्यावर अवलंबून आहे. किम्स सनशाईन या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचं काम पाणी करतो. पाण्याच्या कमतरतेमुळे बद्दकोष्ठता, सांधेदुखी, स्तनाचा कर्करोग, त्वचा संबंधित आजार, अपचन अशा एक ना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे सुदृढ आरोग्य जगण्यासाठी पाणी किती आवश्यक आहे हे यावरुन आपल्याला कळलं असेलच. चला तर मग जाणूया उपाशीपोटी पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे.
पचनसंस्था निरोगी :उपाशीपोटी पाणी प्यायल्यास विषारी पदार्थ शरीराबाहेर पडण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्था सुधारते तसंच ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात.
डोकेदुखीपासून आराम : डिहायड्रेशनमुळे तुम्हाला सकाळी डोकेदुखी होवू शकते. सकाळी पाणी प्यायल्यानं शरीराला हायड्रेट करुन तुम्ही डोकेदुखी पासून मुक्त होवू शकता.
तणाव कमी होतो : मेंदूतील 70 टक्के ऊती पाण्यापासून बनलेल्या असतात. शरीरातील पाणी पातळी कमी झाल्यास डिहायड्रेशन होते. परिणामी मेंदूलाही ताण जाणवतो. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी पाणी पिणं गरजेचं आहे.
रोगप्रतिकार शक्ती सुधारते : रोगप्रतिकार शक्ती चांगली असली की, आपण आजारांचा समाना करु शकतो. परंतु तीच कमकूवत असेल तर आपलं आरोग्य चांगल राहत नाही. त्यामुळे रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यानं लिम्फॅटिक प्रणाली संतुलित होण्यास मदत होते. संक्रमणांशी लढण्यासाठी ऊर्जा देते.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त :नियमीत योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यानं वजन कमी होतो. जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटू शकते. परिणामी तुम्ही कमी कॅलरीज सेवन करता.