महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे 'ही' वनस्पती - ALOE VERA JUICE BENEFITS

रिकाम्या पोटी नियमितपणे कोरफडीचा रस पिण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या कोरफडीच्या रसाचे फायदे.

BENEFITS OF HAVING ALOE VERA JUICE  HEALTH BENEFITS OF ALOE VERA JUICE  HOW TO MAKE ALOE VERA JUICE  ALOE VERA JUICE
कोरफड रस (Freepik)

By ETV Bharat Health Team

Published : Feb 12, 2025, 8:00 AM IST

Benefits Of Aloe Vera Juice:कोरफडीचा रस हा अशा पदार्थांपैकी एक आहे, ज्यात अनेक आरोग्यदायी फायदे दळलेले आहेत. कोरफडीच्या रसात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. कोरफडीचा रस शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी आहे. त्यात असलेले अँटीमायक्रोबियल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडाच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. कॅलरीज कमी असल्याने ते वजन कमी करण्यास देखील मदत करू शकतात.

  • पचनक्रिया सुधारते:कोरफडीच्या रसात असे काही एंजाइम असतात जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. जर्नल ऑफ रिसर्च इन मेडिकल सायन्सेस (2013) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं सूचित करण्यात आलं आहे की, कोरफडीचा रस निरोगी पचनास चालना देण्यास आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम आणि अल्सर सारख्या आजारांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतो. कोरफडीचा रस पचनसंस्थेतील जळजळ कमी करण्यासाठी आणि पचनक्रियेला चालना देण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि पोटफुगीची लक्षणं कमी होण्यास मदत होते. कोरफडीचा रस बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्या टाळण्यास देखील मदत करते.
  • अँटिऑक्सिडंट गुणधर्म: कोरफडीचा रस पॉलिसेकेराइड्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारख्या संयुगांनी समृद्ध आहे. ज्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. फायटोथेरपी रिसर्च (2009) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, हे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. कोरफडीचा रस संधिवातासारख्या समस्या कमी करण्यास आणि एकूण रोगप्रतिकारक मजबूत करण्यास मदत करते.
  • रक्तातील साखर नियंत्रित करते:2008 मध्ये जर्नल ऑफ क्लिनिकल फार्मसी अँड थेरप्यूटिक्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, कोरफडीचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास फायदेशीर आहे. मधुमेह असलेल्यांनी कोरफडीचा रस प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
  • कोलेस्टेरॉलची कमी:शरीरातील कोलेस्टेरॉल आणि रक्तातील ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करण्यास कोरफड मदत करू शकते. कोरफडीचा रस नियमितपणे प्यायल्यास कोलेस्टेरॉलची पातळी सुरळीत राहते. एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यास कोरफडीचा रस मदत करते.
  • त्वचेचे आरोग्य फायदेशीर:त्वचेसाठी वापरल्या जाणाऱ्या त्वचा उत्पादनांमध्ये सर्वात जास्त कोरफडीचा उपयोग करतात. जर्नल ऑफ एथनोफार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, ते त्वचेचे हायड्रेशन राखण्यास आणि जखमा सुधारण्यास मदत करते. मुरुम, एक्झिमा आणि सोरायसिस सारख्या आजारांची लक्षणं कमी करण्यासाठी देखीर कोरफडीचा रस पिणे देखील फायदेशीर ठरू शकते. हे त्वचेच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
  • विषमुक्त करण्यासाठी: कोरफडीच्या रसात शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची क्षमता असते. युरोपियन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन (2004) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं सूचित करण्यात आलं आहे की, कोरफड गॅस्ट्रोइंटेस्टाइनल गतिशीलता वाढविण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करू शकते. कोरफडीचा रस यकृताच्या कार्याला देखील मदत करू शकतो. कोरफडीचा रस हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट्सचा नैसर्गिक स्रोत आहे.
  • हायड्रेटेड ठेवते:कोरफडीचा रस नियमितपणे पिल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. कोरफडीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमीनो आम्ल देखील भरपूर प्रमाणात असतात. हे हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास देखील मदत करेल.
  • यकृताचे आरोग्य: कोरफड यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. फूड अँड केमिकल टॉक्सिकोलॉजी (2012) मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असे दिसून आलं आहे की, विषारी पदार्थांमुळे होणाऱ्या नुकसानापासून यकृताचे संरक्षण करण्यासाठी कोरफडीचा अर्क फायदेशीर ठरू शकतो. कोरफडीचा रस पिणे यकृतामधील विषारी पदार्थ काढून टाकण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी आणि एकूणच यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर आहे.
  • कोरफडीचा रस कसा तयार करायचा: कोरफड तोडून घ्या आणि ते सोलून घ्या. नंतर, ब्लेंडरच्या सहाय्यानं चांगलं ब्लेंड करा. ब्लेंड करण्यापूर्वी त्यात आल्याचे दोन तुकडे, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चतुर्थांश कप पाणी घाला आणि चांगले मिसळा. आता एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि त्यात मध घाला आणि प्या. चांगल्या परिणामांसाठी साखर न वापरणे चांगले.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

ABOUT THE AUTHOR

...view details