हैदराबाद- एसी स्फोट कसं टाळावा- राज्यभरात बहुतांश जिल्ह्यात ४० अंश सेल्सियसहून अधिक तापमान आहे. त्यामुळे अनेकजण घराबाहेर न पडता घरात पंखे, कुलर आणि एसीच वापर करत आहेत. विशेषत: एसीसह कुलरचा वापर वाढला आहे. एसी वापरताना निष्काळजी केल्यास एसीचा स्फोट होऊ शकतो, असा तज्ज्ञांनी इशारा दिला.
एसी स्फोटाची काय आहेत कारणे?
- एसी कॉम्प्रेसर प्रमाणाहून अधिक गरम झाल्यास त्याचा स्फोट होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- एसीमधील रेफ्रिजरंट लाइन्समध्ये दाब वाढल्यानं स्फोट होण्याचा धोका असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- चुकीच्या पद्धतीनं केलेली वायरिंग, लूज कनेक्शन, शॉर्ट सर्किट इत्यादींमुळे एसीचा स्फोट होऊ शकतो.
- एसीच्या कूलिंग सिस्टिममध्ये गॅस गळती झाल्यास स्फोट होऊ शकतो.
- एसी जास्त गरम झाल्यास किंवा व्यवस्थित थंड न केल्यास स्फोट होऊ शकतो.
- योग्य देखभाल आणि वेळेवर सर्व्हिस न केल्यास एसीचा स्फोट होऊ शकतो.
- काहीवेळा विद्युत प्रवाहाच्या चढउतारांमुळे एसीमध्ये बिघाड होऊन स्फोट होतो.
एसीचा स्फोट टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा
- घरात नवीन एसी बसवताना अनुभवी टेक्निशयनकडून बसवून घ्यावा.
- एसीमध्ये काही समस्या असल्यास विनाविलंब टेक्निशियनकडून दुरुस्त करून घ्यावा.
- एसीमधील फिल्टर वारंवार स्वच्छ करावेत. असे केल्यानं एसीमध्ये बिघाड होणार नाही.
- एसीमधून गॅस गळती झाल्याचे आढळल्यास ताबडतोब बंद करा. टेक्निशयनकडून त्वरित दुरुस्त करून घ्या.
- विद्युत प्रवाहात चढ-उतार होत असल्यानं चांगले स्टॅबिलायझर वापरावे.
- एसीचा वापर झाल्यानं खोली थंड झाल्यावर अर्ध्या तासासाठी एसी बंद करा.