मुंबई - Yash Viral Pictures : साऊथचा सुपरस्टार यश सध्या त्याच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटामुळे चर्चेत आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी चित्रपटाबद्दलची अपडेट ही चाहत्यांना देण्यात आली होती. 'टॉक्सिक' हा चित्रपट 2025 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. शेवटी यश 'केजीएफ 2' (KGF 2)मध्ये दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. यानंतर त्याचा बॉक्स ऑफिसवर कुठलाच चित्रपट प्रदर्शित झाला नाही. आता अनेकजण त्याच्या आगामी चित्रपट 'टॉक्सिक'ची वाट खूप आतुरतेनं पाहत आहेत. दरम्यान यश नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.
यशचा किराणा दुकानामधील फोटो व्हायरल :या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार असून साऊथ अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसेल. याशिवाय यामध्ये सनी देओल, गुरफतेह पिरजादा, अरुण गोविल, लारा दत्ता आणि इतर कलाकार दिसणार आहेत. दरम्यान याआधी यश त्याच्या साधेपणामुळे आणि डाउन टू अर्थ असल्यामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. आज 17 फेब्रुवारी रोजी काही सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये यश एका स्थानिक किराणा दुकानातून लहान मुलाप्रमाणे टॉफी खरेदी करताना दिसत आहे. त्याच्याबरोबर त्याची पत्नी राधिका देखील आहे. यश आणि राधिकाचा हा व्हायरल होत असलेला फोटो कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील आहे. यशचा हा फोटो त्याच्या चाहत्याला खूप आवडला आहे.